समाजाने नाकारलेल्यांना मानाचे स्थान आणी स्वावलंबन शिकविण्याचे कार्य जिव्हाळा बेघर निवारातून केले जाते- नितीन धांडे

समाजाने नाकारलेल्यांना मानाचे स्थान आणी स्वावलंबन शिकविण्याचे कार्य जिव्हाळा बेघर निवारातून केले जाते- नितीन धांडे
बीड/प्रतिनिधी
मानसाचा भौतीक विकास होत असतांना मानवी मन संकुचित होत आहे. समाजाने नाकारलेल्याना मानाचे स्थान आणी स्वावलंबन शिकविण्याचे कार्य जिव्हाळा बेघर निवारातून केले जात असून येथे गरिबी श्नीमंतीचा भेदभाव नष्ट होतो असे प्रतिपादन शिवसेनेचे युवानेते नितीन धांडे यांनी तर जिव्हाळा बेघरांसाठी मायेची उब देणारे केंद्र असून येथील रंजल्या गांजल्याची सेवा ही वाखाणण्याजोगी असल्याचे प्रतिपादन शांतीनाथ परजणे यांनी केलें
शहरातील भाजी मंडई परिसरातील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. दि २ तारखेला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना बीड जिल्हा संघटक मा नितीन धांडे आणि साईराम अर्बन मल्टी स्टेट बँकेचे संचालक परभणे साहेब यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.
मदर डे, फादर डे, डॉक्टर डे असे विविध कार्यक्रम आपण साजरे करत असतो. बेघर,अनाथ त्यांच्यासाठी सुद्धा १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक बेघर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने शिवसेनेचे बीड जिल्हा संघटक नितीन धांडे त्यांनी सर्वांना स्वादिष्ट भोजन दिले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, जिव्हाळा बेघर निवारा केंद्राद्वारे बेघर लोकांसाठी राबविले जाणारे कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने केले जातात. आज अश्या लोकांची सेवा करताना त्यांची दाढी-कटिंग त्यांना आंघोळ घालण्यासाठी मोठी हिंमत आणि त्याचबरोबर त्यांच्याविषयी प्रेम लागते. ती सर्व कामे सर्व कर्मचारी आनंदाने करतात. आम्ही ती कामे जवळून पाहिले. येणाऱ्या काळात आमच्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. आपण कोणालाही अनाथ, बेघर समजू नये. आम्ही त्यांच्यासोबत कायम पाठीशी आहोत.
परभणे सरांनी सुद्धा येथील स्वच्छतेचे कौतुक केले. सर्व बेघर अनाथ लोकांची आपुलकीने चौकशी केली.
या कार्यक्रमास जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक श्री राजू वंजारे यांनी येथील कार्याचा आलेख सादर करून शहरातील दानशुरांनी मोठ्या संख्येने मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले थर संचालक अभिजित वैद्य, शालिनी परदेशी, रमेश वीर, यश वंजारे, आणि सर्व लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित वैद्य आणि आभार प्रदर्शन शालीनीताई परदेशी यांनी केले.
