समाजातील नाकारल्या गेलेल्या बेघर, वंचित,अनाथांना मानाचे स्थान आणि स्वावलंबन शिकवण्याचे कार्य "जिव्हाळा"बेघर निवाराकेंद्रातुन केले जाते-सय्यद फेरोज अली

समाजातील नाकारल्या गेलेल्या बेघर, वंचित,अनाथांना मानाचे स्थान आणि स्वावलंबन शिकवण्याचे कार्य "जिव्हाळा"बेघर निवाराकेन्दातुन केले जाते-सय्यद फेरोज अली
बीड/प्रतिनिधी
"World Homeless Day"जागतिक बेघर दिवसाच्या निमित्ताने दि १आक्टो. ते १०आक्टो. पर्यंत बेघर निवाराकेन्दात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज युवा पत्रकार संघाच्या वतीने सय्यद फेरोज अली यांनी आपल्या भाषणात ते म्हणाले की,जिव्हाळा बेघर केन्द्राद्वरे राबविले जानारे कार्यक्रम अतिशय उत्तम केले जातात. आज अशा लोकांची सेवा करतांना त्यांची कटींग दाडी,त्यांना आंघोळ घालण्यासाठी मोठी हिंमत आणि त्यांच्याविषयी प्रेम असावे लागते अशी सर्व कामे येथील सर्व कर्मचारी करत असताना आम्ही जवळुन पाहिले.येणाऱ्या काळात आमच्या पत्रकार संघाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल. बेघर ,अनाथ ,दिव्यांग यांना स्वादिष्ट अन्नदान करण्यात आले. पत्रकार बांधवांनी निवाराकेंद्रातील सर्व लाभार्थ्यांची अस्थेने,आपुलकीने चौकशी केली.या कार्यक्रमात सय्यद फेरोज अली,काझी समीर,शालनी परदेशी, शितल जाधव,मनिषा स्वामी,
इमरान इनामदार,फारोक मनियार,इमरान जागीरदार,तसेच
बेघर निवाराकेन्दाचे व्यवस्थापक श्री. राजु वंजारे, श्री. अभिजित वैद्य काळजी वाहक श्री. रमेश वीर, श्री. यश वंजारे आणि सर्व लाभार्थी उपस्थित होते.
