हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या

Beed

हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या

 परळी येथे जमात-ए-इस्लामी हिंद महिला आघाडीची मागणी

 परळी/प्रतिनिधी

उत्तरप्रदेशातील हाथरस येथील घटना भारत देशाला काळिमा फासणारी आहे. अशा  घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरत  आहे. महिला स्वतःला असुरक्षित समजत आहे. हाथरस  सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी येथील जमात-ए-इस्लामी हिंद महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. 

 हाथरस मध्ये १९ वर्षीय तरूणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार करून तरूणीची जीभ कापून तिची मान मोडण्याचे अमानुष कृत्य केले. अशा गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे. अशा घटना महिलांचे मनोधैर्य खच्चीकरण व भयभीत करणारे आहे.
 हाथरस सारख्या घटना देशात पुन्हा होऊ नये म्हणून गुन्हेगारांना फाशी द्यावी अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.
 यावेळी शेख इरशाद, इफ्फत खान, सय्यद हिना, सय्यद खुरत, सय्यद तहुरा, सय्यद अमीना, शेख नाहेद,  शेख सायमा,  शेख फरदा आदी महिला सहभागी झाले होते.
 घोषणांच्या फलकाने लक्ष वेधले

 हाथरस घटनेच्या निषेधार्थ नारी सन्मान देश का सन्मान, वी वॉन्ट रेप फ्री इंडिया, डेथ पेनॉल्टी फॉर ऑल रेपिस्ट, स्टॉप कम्युनिलिजम    रेप केस अशा घोषणांचे फलक नागरिकांचे लक्ष वेधत होते.  हाथरस सामूहिक बलात्कार घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करतांना जमाते- ए-इस्लामी हिंद महिला आघाडीच्या कार्यकर्त्या.

Sharing

Visitor Counter