ऊस तोडणी वाहतूक दार मुकादम यांनी संपास सहकार्य करा- शंकर चाटे

Beed

ऊस तोडणी वाहतूक दार मुकादम यांनी संपास सहकार्य करा-शंकर चाटे

वडवणी/दत्ता करडे

ऊस तोडणी करणारा मजूर, ऊस वाहतूक दार,तसेच मुकादम यांना कळकळीची विनंती आहे.
हा संप एकट्याचा नसून सर्व ऊस तोडणी वाहतूक दारांचा आहे.
कारखाने चालू झाले आहेत. परंतु आपण कारखान्याला जर नाही गेलो तर एकही ऊस कारखान्याला जाणार नाही.
ऊस हा आपल्यालाच तोडायचा आहे.तुम्ही जर आठ दिवसाच्या खेपा चे नुकसान बगत असाल तर फार अवघड आहे. ऊस तोडणी वाहतूक दार (नवरा/बायको) यांना असा रोज पडतोय किती? चारशे नाहीतर पाचशे रुपये ,अरे इथं रोजनदारी शेतीत काम जर केलं तर एक गडी ला तीनशे रु मिळतात. आज आशा महागाईच्या काळात चारशे रुपये रोज ते पण दोन माणसाला असे का.रात्री आहो रात्री उठायचं ट्रक्टर आला की रात्री बारा वाजो या दोन काही असो आजारी असो की कसाही असो ट्रक्टर  भरायचा भरायला (तीन) वाजणार भरला की सकाळी पहाटे (चार) वाजता उठले अरे हे काय जगणे झाले का .ऊस तोडणी करणारा हा एक माणूसच आहे. ऊस तोडणी म्हणजे काय सोपं वाटलं काय . अरे प्रत्येक जाग्यावर प्रत्येक ठिकाणी मजुराला रक्त ओकावे लागत आहे. ते कष्ट म्हणजे रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा घामाचा पैसा आपल्या हक्काचा आपल्या कष्टाचा घेयला कसली आलीय भीती . या ऊस तोडणी मजूर कामगार यांना दबावात आणून , मुकादम व वाहतूक दार यांनी बळच कारखान्याला नेयु नये. कारखाना दार हे प्रचंड पैसे कमावत आहेत. यांना काय कोण काय मेला काय आणि गेला काय . म्हणून ऊस तोड मुकादम व वाहतूक दार यांनी संपला सहकार्य करा असे , जय भगवान    महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष शंकर आण्णा चाटे यांनी म्हंटले आहे. रात्र ,रात्र जागून ते फार ऊस तोडणी मजूर यांच्या साठी काम करत आहे. दि १०/१०/२०२० रोजी दुपारी १२ वाजता वडवणी धारूर रस्त्यावर  थांबून  कारखान्याकडे जाणारे त्यात ऊस तोडणी मजूर नसून ते दुसऱ्या वहाणा मध्ये नेऊन रिकामे ट्रक्टर त्या मध्ये बाजरी , सरपण, असे जीवनावश्यक वस्तू टाकून चालले होते. यांना सर्वाना चहा पाजून समजावून सांगून  शंकर चाटे यांनी त्यांना आपल्या गावी परत पाठवले . तरी आपल्या आपल्या तालुका गाव सर्व ऊसतोड कामगार वाहतूक दार यांनी सहकार्य करावे असे त्यांनी म्हंटले आहे.

Sharing

Visitor Counter