शेतकऱ्यांची थट्टा थांबवा,तात्काळ नुकसान भरपाई द्या-आ.विनायकराव मेटे

शेतकऱ्यांची थट्टा थांबवा,तात्काळ नुकसान भरपाई द्या-आ.विनायकराव मेटे
खांडे पारगाव परिसरात तहसीलदार समवेत केली पीक नुकसान पाहणी
बीड/प्रतिनिधी
परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन सडून गेली,कापसाच्या पावसामुळे वाती झाल्यात बोड सडायला सुरवात झाली अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे,तुरीचे पीक करपून जात आहे.शेतकरी अतोनात नुकसानाने हवालदिल झाला आहे तरीही सरकार झोपेचं सोंग करत आहे. सरकारने शेतकऱ्याची कुचेष्टा,थट्टा थांबवावी तात्काळ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात असे आ.विनायकराव मेटे यांनी दुसऱ्या दिवसाच्या शेतकरी पीक नुकसान पाहणी दौऱ्यात खांडे पारगाव परिसरात नूतन तहसीलदार शिंदे साहेब तालुका कृषी अधिकारी गंन्डेयांच्या समवेत पाहणी करण्यात आली.
या वेळी आ.विनायकराव मेटे साहेब,तहसीलदार शिंदे साहेब, ,तालुका कृषी अधिकारी गंन्डे साहेब,नायब तहसिलदार अभय जोशी, तलाठी अरुणगुरसळी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे खांडे पारगाव सरपंच आसाराम आमटे यांच्या समवेत शेतकऱ्यांनाच्या शेतात जाऊन पीक नुकसान पाहणी करण्यात आली या वेळी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, ,जिल्हा सरचिटणीस विनोद कवडे , माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे ,सरपंच आसाराम आमटे,माजी सभापती सखाराम ठोकळ,ऊसतोड नेते बबन माने,विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे ,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष अक्षय माने,सरपंच गणेश साबळे, , सरपंच मसुराम सोळुंके,सुनील धयजे,रुद्र मकले,सखाराम ठोकळ,उपसरपंच सुभाष सपकाळ,उपसरपंच विश्वाभर सपकाळ,गोरख पाटील,बबन आबा आमटे,विश्वास पाटील,नितीन आमटे,चेरमान बाबूलाल सय्यद,अरुण आमटे,खाजभाई पठाण,वरसकीत साळुंके,बाळू सोळुंके,सचिन आमटे,नवनाथ सपकाळ,सुग्रीव आमटे,राजू करपे,विठ्ठल आमटे,ज्ञानेश्वर वैध,सदीपन ठोकळ,बाबू सपकाळ,आदी शेतकरी उपस्थित होते
