घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद करुन त्याने बीड जिल्हा हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न

Beed

घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद करुन त्याने बीड जिल्हा हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न 

बीड/प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या व घरफोड्या सारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस यावेत यासाठी मा . पोलीस अधीक्षक , बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना वेगवेगळे तपास पथके तयार करुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक , स्थागुशा , बीड यांचे आदेशाने सपोनि आनंद कांगुणे व सोबत पोलीस कर्मचारी असे दिनांक 22/10/2020 रोजी 11.30 वा च्या सुमारास गेवराई पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की , बीड जिल्ह्यात चोऱ्या व घरफोड्या करणारा आरोपी प्रशांत घुमीर चव्हाण , रा . चिचोंडी पाटील , ता . जि . अहमदनगर हा बागपिंपळगाव फाटा येथे आला आहे . नमुद बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथक बातमीच्या ठिकाणी जावुन पहाणी केली असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचा इसम बागपिंपळगाव फाटा येथे मिळुन आला . नमुद इसमास पोलीस पथकाने जागीच ताब्यात घेतले . त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रशांत घुमीर चव्हाण , वय 20 वर्षे , रा . चिचोंडी पाटील , ता . जि . अहमदनगर असे सांगितले . त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगितले की , मी व माझे इतर साथिदार असे आम्ही सात आठ महीन्यांपुर्वी तलवडा हद्दीतील वाहेगाव आम्ला या गावात माझ्या मोटार सायकलवर जावुन रात्रीच्यावेळी घरफोडी करुन चोरी केली होती . त्यानंतर आम्ही परत जात असताना आमच्या पाठीमागे गावातील लोक लागल्याने आम्ही आमच्या ताब्यातील मोटार सायकल तेथेच टाकुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेलो होतो असे सांगितले . त्यावरुन तलवडा पोलीस ठाणे येथील गुन्हे अभिलेख तपासला असता दिनांक 18/03/2020 रोजी तलवडा पोलीस ठाणे येथे गुरनं 57/2020 , कलम 457 , 380 भादवि नोंद असुन नमुद आरोपींनी तेथे सोडलेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक MHI6 CR 3261 ही तलवडा पोलीस ठाणे येथे जमा असल्याचे समजले . तसेच नमुद आरोपीताकडे अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की , सहा सात महीन्यापुर्वी मी व माझे इतर साथिदार असे आम्ही मिळुन गेवराई हद्दीत आहिल्यानगर येथे रात्रीच्यावेळी घरफोडी करुन चोरी केली होती व दहा ते अकरा महीन्यांपुर्वी आष्टी येथे औदुंबर नगर येथे रात्रीच्यावेळी घरफोडी करुन चोरी केली होती . त्यावरुन गेवराई पोलीस ठाणे येथील गुन्हे अभिलेख तपासला असता दिनांक 20/04/2020 रोजी गेवराई पोलीस ठाणे येथे गुरनं 193/2020 , कलम 457 , 380 भादवि व आष्टी पोलीस ठाणे येथे दिनांक 04/12/2019 रोजी गुरनं 340/2020 , कलम 454,457,380 भादवि नोंद असल्याचे समजले . नमुद आरोपी नामे प्रशांत घुमीर चव्हाण , वय 20 वर्षे , रा . चिचोंडी पाटील , ता . जि . अहमदनगर याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने पोस्टे तलवडा , पोस्टे गेवराई व पोस्टे आष्टी हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे . नमुद आरोपीतास दिनांक 22/10/2020 रोजी तलवडा पोलीस ठाणे येथे हजर केले असुन त्याच्याकडुन आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . पुढील तपास तलवडा पोलीस ठाणेचे सपोनि सुरेश उनवणे हे करत असुन गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रीया चालु आहे . सदरची कामगिरी मा . वरिष्ठांच्या आदेशाने पो.नि.श्री . भारत राऊत स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि आनंद कांगुणे , पोह 207 / जगताप , पोना 1280 / कदम , पोना 1333 / वाघमारे , पोना 1330 / बागवान , पोना 568 / ठोंबरे , पोशि 1302 / गायकवाड , चालक पोना 300 / हराळे , पोना 213 / गर्जे , पोना 853 / हारके यांनी केलेली आहे .

Sharing

Visitor Counter