चारिञ्याच्या संशय घेऊन पतिने च केला पत्नीचा खुन

Beed

चारिञ्याच्या संशय घेऊन पतिने च केला पत्नीचा खुन

अंबड तालुक्यातील बळेगाव येथील खलबळजनक घटना

अंबड/भागवत गावंडे 

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने तिच्या डोक्यात लोखंडी (फुकणी) पाईपने मारहाण करून जीवे मारल्याची खळबळजनक घटना काल (ता.27) सायंकाळी साडे पाच वाजे सुमारास अंबड तालुक्यातील बळेगाव येथे घडली.
    बळेगाव येथील उर्मिला अंकुश झिंजुर्डे (वय 32) या महिलेचा पती अंकुश नारायण झिंजुर्डे याने काल आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन घरासमोरच लोखंडी फुकणीने तिच्या डोक्यात मारहाण करून गंभिररीत्या जखमी केले. दरम्यान नातलगांनी तीला उपचारासाठी तात्काळ औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापुर्वीच तीचा मृत्यू झाला.
      याप्रकरणी आरोपीची आई केसराबाई नारायण झिंझुर्डे यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिस ठाण्यात अंकुश झिंजुर्डे याच्याविरुद्ध भांदवि कलम 302 अन्वये  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड व पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी सदर आरोपीस तात्काळ अटक केली आहे.

Sharing

Visitor Counter