प्रा. डॉ. शंकर अंभोरे यांच्या वरील खोटे आरोप सहन केले जाणार नाही. - प्रा. डॉ.धम्मपाल घुंबरे

प्रा. डॉ. शंकर अंभोरे यांच्या वरील खोटे आरोप सहन केले जाणार नाही. - प्रा. डॉ.धम्मपाल घुंबरे
वडवणी/दत्ता करडे
स्वाभिमानी मुप्टा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ शंकर अंभोरे हे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने लढत आहेत व त्यांना न्याय मिळवून देत आहेत. अशा कर्तव्यदक्ष व्यक्तीवर जाणीवपूर्वक खोटे सूडबुद्धीने खालच्या थराला जाऊन जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे व खोटे आहेत हे सहन केले जाणार नाही. असे एका पत्रकाद्वारे स्वाभिमानी मूप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. धम्मपाल घुंबरे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये काम करत असलेले अनेक प्राध्यापक शिक्षक हे स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या माध्यमातून आज व्यवस्थितपणे अनेक संस्थेमध्ये बिनधास्तपणे काम करत आहेत ते केवळ स्वाभिमानी मुप्टा संघटने नेते डॉ. शंकर अंभोरे यांच्या अथक मेहनतीचे व परिश्रमाचे फळ आहे, पण काही विघ्नसंतोषी लोक जाणीवपूर्वक या नेतृत्वाला बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहेत, हे षडयंत्र हाणून पाडू. मागच्या महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बेकायदेशीर/ बोगस नियुक्त्या उघडकीस आणण्यात स्वाभिमानी मुप्टा संघटनेचा मोठा सहभाग होता. दि. 7 आक्टोबर 2020 रोजी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांनाही न्याय देऊन प्रा. डॉ. सुरेंद्र भिवगडे यांना यांच्यावरचे खोटे आरोप उघडीच आणून महाविद्यालयातील प्राचार्यांना प्रा. डॉ. सुरेंद्र भिवगडे रुजू करून घेण्यास भाग पाडले. थोड्याच दिवसात पदवीधर आमदार निवडणूक येत असल्याने जाणून बुजून हे बदनामीचे कट कारस्थान केले जात आहे. फक्त नाहरकत प्रमाणपत्र याविषयीचा अर्ज असताना सुद्धा संघटनेच्या कार्यकर्त्यांना फूस लावून आर्थिक मुद्दा समोर करून तक्रारी देण्यासाठी भाग पाडले होते. व जातीयवादी मानसिकतेने बरबटलेले लोक हेतुपुरस्सरपणे हे घडवून आणू पाहत होते. तो हाणून पाडण्यात येईल असे पत्रकात सांगण्यात आले आहे.
