जिव्हाळा शहरी बेघर निवारा केन्द्रात डॉ.आंबेडकर जयंती साजरी

Beed

 बीड/प्रतिनिधी 
शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री.मोरे यांनी जिव्हाळा शहरी बेघर निवाराकेन्द्राला भेट दिली व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

डॉ.आंबेडकर जयंती निमित्त आपले विचार व्यक्त करुन सर्व बेघर लाभार्थ्यांना टाळेबंदी बद्दल आपण काय खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व कोरोना सारख्या आपत्ती ला लढण्यासाठी पोलिस कर्मचारी सज्ज तयार आहे. 

कोरोना सारख्या आपत्तीला बळी न  पडता त्याच्या सोबत कसा लडायचा हे लोकांना समजुन सांगीतले. कुठे ही गर्दी करणे टाळा,कामा शिवाय बाहेर पडु नका,तोंडाला मास्क किंवा रूमालचा वापर करा,सेनिटयजर चा वापर करा खुप सुंदर आशा प्रकारे लोकांना समजुन सांगण्याचा पोलिस निरीक्षक श्री.मोरे यांनी केले.

Sharing

Visitor Counter