राजापुर येथे कापसी नदीवर महीलांचे जल आंदोलन संपन्न

राजापुर येथे कापसी नदीवर महीलांचे जल आंदोलन संपन्न
नदीवरील तिन पुल व रस्त्यासाठी महीला व शेतकर्यानी केले आंदोलन
लेखी आश्वासनावर महीलानी आंदोलन घेतले मागे
गेवराई/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील कापसी नदीवर तिन व रसत्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी आहे रघडलेल्या पुल रस्त्यासाठी कापसी नदीवर आज जल आंदोलन करण्यात आले पाटबंधारे विभागाच्या अधिकारी पवार याच्या लेखी आश्वासन पञानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील राजापूर येथील कापसी नदीवर तिन व रसत्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होती परंतू काम होत नसल्याने आज दि 2 /11/ 2020 रोजी शेकडो महीला व शेतकर्यानी कापसी नदीत उतरुन जल आंदोलन केले संबंधित विभागाला वारवार कळऊन सुध्दा काम होत नसल्याने गावकरी वैतागले होते या कापसी नदीवरुन शेतकर्याना दररोज ये जा करावे लागत आहे छातीभर पाण्यातुन वाट सापडीत गावकर्याना जिव घेणा प्रवास थांबनार कधी असा सवाल गावकरी व महिलांनी केला आहे गेल्या आठ वर्षांपासून हा प्रश्न गंभीर आहे या कारणामुळे महीलानी आज जल आंदोलन केले संबंधित उपअभियंता विभाग उपविभाग वडी गोद्री ता अंबड जि जालना यांच्या लेखी पञानंतर गावकरी व महीलानी थेट उपस्थित अधिकारी सय्यद याना पाण्यात उतरुन निवेदन दिले आणी आंदोलन मागे घेतले आंदोलक महानंदा औंडकर,आर्चना शिवाजी बेडके, जयश्री तळेकर,कविता बेडके,सोमीञा जाधव,तसेच शेतकरी पंडीत औंडकर,राजेश राजगुरु,किसन बेडके ,दगडूराम बेडके, बाबासाहेब बागल,अजीनाथ सोनवने,शेख मोहमद,गोविंद जाधव, सजन पठान विठल गवते,काकुराम उबाळे ,प्रल्हाद बेडके, नुरखा पठाण,राम बागल ज्ञानेश्वर पवार यावेळी जातेगावचे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी उपस्थित दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदवत आंदोलन केले आहे यावेळी तलवाङा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उनवने साहेब, माणे साहेब , खाडे साहेब सह पोलीस बंदोबस्त व आरोग्य विभाग तलवाङा कर्मचारी उपस्थित होते.
