माजलगाव येथील मोंढा भागातील जबरी चोरीचा गुन्हा डघडकीस , दोन आरोपी अटक

Beed

माजलगाव येथील मोंढा भागातील जबरी चोरीचा गुन्हा डघडकीस , दोन आरोपी अटक 

बीड/प्रतिनिधी  

दिनांक 26/10/2020 रोजी फिर्यादी नामे मंकेश मोहन खांडे रा . पिंपळगाव मजरा ता.जि.बीड याने पो.स्टे . माजलगाव येथे फिर्याद दिली होती की मी बीड येथील लोखंडाचे व सिमेंटचे व्यापारी काटकर यांचे स्कापीओ गाडीवर ड्रायव्हर म्हणुन आहे . मी दिनांक 26/10/2020 रोजी व्यापारी काटकर यांना स्कापीओ मध्ये घेऊन मालाच्या उधारी वसुलीसाठी माजलगावला गेलो होतो . मी माजलगाव येथे जुनामोंढा बायपास रोडवर असतांना काटकर हे मोंडयात गेले व काटकर यांनी माझेकडे दिलेले मालाच्या वसुलीचे पैसे दुपारी 1.15 वाजेचे सुमारास तीनअनोळखी इसमांनी मला मारहान करुन छातीत खुपसण्याचा धाक दाखवुन गाडीतील बॅग मधील रोख रक्कम व मोबाईल किंमती 1,80,000 / -रु चा माल जबरीने चोरुन नेला आहे . वरील फिर्याद वरुन पोलीस ठाणे माजलगाव शहर गुरन 137/2020 कलम 394 , 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता . सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करुन गुन्हा उघडकीस आनने बाबत मा . पोलीस अधीक्षक साहेब बीड यांनी सक्त सुचना दिल्या होत्या त्यावरुन मा . पोलीस निरीक्षक श्री . राऊत सो.यांनी सदर गुन्हा उघडकीस आणने कामी दिनांक 04/10/2020 रोजी माजलगाव भागात स्थागुशा चे पथक पाठवुन त्यांना योग्य त्या सुचना देऊन मार्गदर्शन केले . सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी माजलगाव भागात गुप्त बातमीदारा मार्फत माहीती घेऊन सदर गुन्हा हा गुन्हयातील फिर्यादी मंकेश मोहन खांडे यानेच केला असुन सदरचे पैसे व मोबाईल त्याचा मावस मेव्हणा विजयानंद आगे रा . किट्टीआडगाव याचे कडे दिले आहेत अशी माहीती मिळाल्याने विजयानंद राजाभाऊ आगे रा . किट्टीआडगाव यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की मंकेश खांडे व मी गुन्हा केला आहे असे सांगुन गुन्हयातील चोरलेला ओपो कंपीनचा मोबाईल हजर केला व गुन्हयातील पैसे 70,000 / -रु रोख मंकेश खांडे घेऊन गेला आहे असे सांगीतले . त्या नंतर मंकेश मोहन खांडे रा . पिंपळगाव मझरा ता . बीड याचा शोध घेऊन त्यास पिंपळगाव येथे ताब्यात घेऊन विचारपुर केली असता त्याने सदरचा गुन्हा मीच केला असुन फिर्याद पण मीच दिली आहे असे सांगुन गुन्हयातील चोरलेले नगदी 70,000 / - रु त्याने काढुन दिलेने जप्त करण्यात आले आहेत . सदर गुन्हयातील दोन आरोपी नामे 1 मंकेश मोहन खांडे व विजयानंद राजाभाऊ आगे यांना निष्पन्न करुन गुन्हयात चोरी गेलेला मोबाईल व रोख रक्कम त्यांचे कडून जप्त करुन पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे मुद्देमालासह आरोपी हजर करुन सदरचा गुन्हा उघकीस आनला आहे . सदरची कामगिरी वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीड चे पो.नि. श्री . भारत राऊत , पोउपनि संतोष जोंधळे , पोह मोहन क्षीरसागर , श्रीमंत उबाळे , संतोष काळे , शेख सलीम , पोना कैलास ठोंबरे , युनूस बागवान , शेख आसेफ व चालक संतोष हारके यांनी केलेली आहे . गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.राठोड पोस्टे माजलगाव शहर हे करीत आहेत .

Sharing

Visitor Counter