किल्ले धारूर नगर परिषदने ऐतिहासिक वस्तूंचे जतन करावे विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा प्रमुख अतीक मोमीन
Beed

किल्ले धारूर नगर परिषदने ऐतिहासिक वस्तूंचे जतन करावे विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा प्रमुख अतीक मोमीन
किल्ले धारूर/इरफान शेख
किल्ले धारूर शहर हा ऐतिहासिक असून शहरात अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत.ज्यांच्याकडे लक्ष न दिल्याने त्यांची बिकट अवस्था झालेली आहे.किल्ले धारूर नगर परिषदेने नगर परिषद हद्दीतील नुरबाग येथील गुमट,कसबा विभागातील काजी कब्रस्तान येथील गुमट तसेच शहरातील ऐतिहासिक जुनी वेसी(कमान) यांच्या सुशोभिकरण करून त्यांचे जतन करावे.अशी मागणी बीड जिल्हा विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा प्रमुख अतीक इस्माईल मोमीन यांनी या प्रसिद्धि पत्रकाद्वारे नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
