पोलीस ठाणे आष्टी यांच्या कडुन सन 2014 पासुनचा 187 दारुबंदीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला

पोलीस ठाणे आष्टी यांच्या कडुन सन 2014 पासुनचा 187 दारुबंदीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला
बीड/प्रतिनिधी
मा . पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामधील गुन्ह्यातील मुद्देमाल निर्गती मोहिम सुरु आहे . या मोहिमे अंतर्गत पोलीस ठाणे आष्टी येथे सन 2014 पासुन प्रलंबीत असलेला 1000 / -रूपये पेक्षा जास्त किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील देशीविदेशी दारूचा 133 गुन्हयांचा मुद्देमाल बऱ्याच दिवसा पासुन मुद्देमाल गृहा मध्ये पडून होता . सदरचा मुद्देमाल ज्या गुन्ह्यांमध्ये जप्त होता त्या गुन्ह्यांच्या कोर्ट समरी हस्तगत करून मा.न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सदर मुदेमाल नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क बीड यांना पत्र व्यवहार केला . त्यानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क , बीड यांचे सदर मुद्देमाल नष्ट करणे बाबत आदेशाचे पत्र प्राप्त झाल्याने दिनांक 22.12.2020 रोजी पोलीस ठाणे आष्टी येथे राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी व कर्मचारी हजर येऊन सर्व मुदेमाल दुरक्षेत्र कडा येथील मोकळया पटांगणा मध्ये दोन पंच व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे आष्टी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.सलीम चाऊस तसेच पोलीस ठाणे आष्टी येथील क्राईम मोहरीर पोना / 1497 केदार व त्यांचे मदतनीस पोशि / 404 अडागळे यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे योग्य ती तजविज ठेऊन मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे . तसेच 1000 / - रु . पेक्षा कमी किंमतीचा दारुबंदीच्या 54 गुन्ह्यातील मुद्देमाल उपविभागीय पोलीस अधिकारी , आष्टी यांची परवानगी घेवून आष्टी पोलीस ठाणे येथे नष्ट करण्यात आला आहे . सदरची कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.सलीम चाऊस , क्राईम मोहरीर पोना / 1497 केदार व त्यांचे मदतनीस पोशि / 404 अडागळे यांनी केली आहे .