अबब ! गेवराईशहरात ३०० रु.ची सिमेंट बॅग ४५० रु. दुकानदाराकडुन ग्राहाकांची लुट !

Georai

जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देण्याची गरज आहे !

गेवराई /प्रतिनिधी

कोरोना व्हायरस मुळे संपुर्ण देशात लाॅकडाउन आहे गोर गरीब लोकांची उपास मारीची वेऴ आली आहे.काही  सामाजीक लोक थोडीफार मदत कारतात परंतु  त्याने किती दिवस लोक जगतील ? असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे.आश्या परिस्थीतीत गेवराई शहरातील  हातावर पोट भरणारे लोक  वेळे नुसार काम करताना दिसुन येते याठिकाणी लोकांची समस्या अता वाढताना दिसत आहे. 

अशा समस्येचा गैर फायदा घेताना गेवराई  शहरातील काही  दुकानदार दिसत आहे.लोकांची फसवणूक करून दरात वाढ करून सामान विक्री करूण ग्राहकांची आर्थीक लुट करताना  याठिकाणी दिसुन येते आहे. 

गेवराई शहरातील काही हार्डवेअरच्या दुकानात लूट होताना दिसत आहे याठिकाणी सिमेंटचे बॅग ३००रुपये वाली ४५० रुपयाला देण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर याठिकाणी हमाली व रिक्शा भाड्याची देखील ज्यास्त मागणी करताना लोक दिसत आहे या कडे प्रशासने लक्ष देण्याची गरज आहे.

Sharing

Visitor Counter