कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड नगर परिषद प्रशासन सज्ज

Beed

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड नगर परिषद प्रशासन सज्ज

उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांच्या संकल्पनेतुन शहरातील गरजू लोकांना दहा हजार मास्क वाटप करण्यास सुरुवात

      

बीड(प्रतिनिधी) : बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती यांच्या संकल्पनेतून वैयक्तिक आरोग्यची निगाराखण्यासाठी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने शहरातील जे लोक मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात आशा गरजू लोकांना दहा हजार मास्क वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नगरसेवक भैय्या मोरे, रंजित बनसोडे, माजी नगरसेवक अश्फाक इनामदार, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पंकज बाहेगव्हानकर यावळी उपस्थित होते. या सर्व लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी मास्क लावूनच बाहेर पडावे असे आवाहन देखील स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी यावेळीं केले.

Sharing

Visitor Counter