आठवडी बाजाराचे नियोजना अभावी वाहतुकीची कोंडी मुख्याधिकारी आहे तरी कुठे

आठवडी बाजाराचे नियोजना अभावी वाहतुकीची कोंडी
मुख्याधिकारी आहे तरी कुठे
किल्ले धारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर शहरात मागील काही काळामध्ये नगरपरिषद च्या वतीने बाजार तळावर बांधकाम चालू होते त्यामुळे कसबा भागात बाजार भरवण्यात येत होता मात्र बांधकाम होऊन सुद्धा जैसे थे परिस्थिती आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. पहिल्या बाजार तळावर बाजार भरावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे
येथील नगरपरिषद च्या वतीने भवण्यात येत असलेल्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणत नियोजन अभावी वाहतुकीची कोंडी पहावयास मिळत आहे कसबा व बाजार पेठ या दोन्ही भागांना जोडणारा मुख्य रस्ता असून याच रस्त्या नगरपरिषद,कडे जाणारे नागरिक वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रस्त होत आहेत तात्काळ नगरपरिषद ने आठवडी बाजाराचे योग्य नियोजन करत वाहतूक निवळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे
चौकट
रस्त्यावर बाजार भरत असल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे तरी नगर परिषदेने यामध्ये लक्ष घालून बाजार तळावरच बाजार भरावा व अडथळा निर्माण होणारा दुर करावा मुख्याधिकारी ड्युटीवर कमी व सुट्टीवर जास्त असल्यामुळे शहराकडे दुर्लक्ष होत आहे
नितीन शिनगारे शहराध्यक्ष