बांधकाम मजुरांच्या खात्यात दोन हजार रु.जमा !

बीड/प्रतिनिधी
कोरोना सारख्या आपत्तीचा आज देश सामना करताना दिसत आहे व सामना करताना कितीतरी लोकांचे हाल होत आहेत तरी लोक हिम्मत ना हारता कोरोनाचा सामना करण्यासाठी लोक तयार आहेत.
आज मजुर लोकांचे हाल होताना दिसत आहेत मजुर लोक रोज करूण खाणारे आहेत यांना काम केला तरच त्यांचा उदरनिर्वाह भागु शकतो पण आज लाॅकडाउन असल्याने त्यांना उपाशी मरण्याची वेळ आलीआहे.
सरकार ने योग्य ते निर्णय घेऊन मुख्यमंत्री निधीतून २००० रू. खात्यामध्ये जमा केले.मजुरांचा काम बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती हातावर पोट असल्यामुळे त्यांना केल्याशिवाय भाग नाही.
घर चालणं कठीण होतं त्यामुळे अनेक कामगार ची उपासमारीची वेळ होती पण आज आपल्या बीड शहरामध्ये मुख्यमंत्री निधीतून बांधकाम इमारत मजुरांना २००० रु. मजुरांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून बरेच लोकांच्या खात्यात मध्ये २००० रु. जमा झाले आहेत.