काकु-नाना प्रतिष्ठानच्या वतीने धान्य व मास्क चे वाटप

Beed

बीड/प्रतिनिधी 

कोरोनाच्या या माहामारीला लोक अता खुप कंटाळले असुन तरी देखील कोरोना सारख्या आपत्तीचा लोक सामना करण्यासाठी सज्ज तयार आहेत परंतु या ठिकाणी लोकांची बिकट परिस्थिती निर्माण देखील झालेली आहे.अशाच लोकांना मदत म्हणुन  मा.मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला. 
 
बीड शहरातील महिला बचत गटातील गरजुवंत कुटुंबांना धान्य व मास्कचे वाटप लोकनेते मा.मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर आणि बीड नगरीचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काकु-नाना प्रतिष्ठानच्या सहकार्याने शालिनी परदेशी आणि ललिता तांबारे यांनी बीड शहरातील महिला बचत गटा तिल गरजुवंत महिलांच्या कुटंबाना ज्यांना  रेशनकार्ड नाही ज्यांना राशनचे धान्य भेटत नही अश्या कुटुंबांना  गहू आणि मास्क चे वाटप केले.

कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांची घेतलेली काळजी यासाठी महिला बचतगटातील महिलांनी आणि नागरिकांनी आण्णासाहेब व अध्यक्षसाहेब यांचे मनातुन आभार व्यक्त केले.

Sharing

Visitor Counter