चंपावतीताई पानसंबळ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत दिला पञकार बांधवांना मदतीचा हात

चंपावतीताई पानसंबळ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत दिला पञकार बांधवांना मदतीचा हात
पाटोदा/शेख महेशर
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बागळता कोणत्या ही प्रकारची चांगली किंवा वाईट घटना घडल्यावर त्याचे सत्य जाणून घेऊन लोकांसमोर घेऊन येण्याचे काम करणारे कोणत्या ही वर्गावर अन्याय होत असेल तर त्याला आपल्या लेखणीतून न्याय मिळून देण्यासाठी दिवस-रात्र झटणारे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून ज्यांच्या कडे पाहिले जाते, असे पत्रकार बांधवाना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडॉऊन मुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. या मुळे मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व पाटोदा तालुक्यात जाधव कुटुंबात जन्म घेतलेल्या सौ.चंपावतीताई पानसबळ यांनी पाटोदा तालुक्यातील पञकार बांधवाना किराणा सामान देऊन पञकार बांधवाचा सन्मान केला.
चांगल्या काळात फोन करुन करुन बातम्या येण्यासाठी कार्यक्रमाला बोलवणारे भले मोठ मोठाले नेते अडचणीच्या काळात घरात बसलेले असताना लोकप्रतिनिधी नसताना देखील आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या सौ चंपावतीताई पानसंबळ यांनी सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून विधान परिषद सदस्य आमदार मा.सुरेशरावजी अण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली व माणुसकीची भिंतच्या दत्ता देशमाने यांच्या माध्यमातून व श्री.लक्ष्मण सस्ते, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्री.भाकरे यांच्या हस्ते पञकार बांधवाना मदतीचा हात म्हणून पाटोदा तालुक्यातील पञकार बांधवांना जीवनावश्यक वस्तू ज्या मध्ये तेल, मीठ, साखर, शेंगदाणे, पोहे, चहापत्ती पूडा, साबण, इत्यादी किराणा सामान सह कोरोना विषाणू पासून संरक्षण व्हावे म्हणून सॕनिटायझर व हॅन्डग्लोज असलेल्या किटचे वाटप करून पञकार बांधवाची काळजी घेतली. या मुळे भलेभले नेते घरात बसले असताना पञकार बांधवाच्या अडचणीच्या काळात चंपावतीताई पानसंबळ (काकी)मदतीला धावून आल्याने व कसल्या ही प्रकारच्या लोकप्रतिनिधी नसताना देखील पत्रकार बांधवांचा विचार केल्याने पञकार बांधवाच्या वतीने चंपावतीताई पानसंबळ (काकी) यांचे आभार मराठी पञकार परिषदेचे बीड जिल्हाउपाध्यक्ष पोपटराव कोल्हे यांनी मानले. या वेळी मोठय़ा संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
