धारूर येथील बालाघाट प्रतिष्ठाच्या वतीने पत्रकारांना सुरक्षा किटचे वाटप

Dharur

धारूर येथील बालाघाट प्रतिष्ठाच्या वतीने पत्रकारांना सुरक्षा किटचे वाटप        
किल्ले धारूर/इरफान शेख

धारूर येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या बालाघाट प्रतिष्ठानने पत्रकार बांधवांना सुरक्षा किट बालाघाटाच्या अध्यक्ष तथा धारूर नगरपरिषदेचे  नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी यांच्या हस्ते वाटप केले     
कोरोना या विषनुने जगात थैमान घातले आहे देशात व राज्यात लॉक डाऊन सारखे कठोर पाऊल शासनाला उचलावे लागले आहे कोरोना या विषाणू पासून जनतेचा बचाव करण्यासाठी डॉक्टर, पोलीस यांच्या खांद्याला खांदा लावून  बरोबरीत पत्रकार देखील कार्य करत आहेत त्यांचेही आरोग्य महत्वाचे आहे आज लोशहीचा चौथा स्तंभ देशातील पत्रकार आहेत प्रसार माध्यमामुळे जनजागृती होते खरी वास्तव परिस्थिती लोकां पर्यंत पोहचवली जाते    
पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी बालाघाट प्रतिष्ठानने धारूर येथील सर्व पत्रकार बांधवांना सुरक्षा किट वाटप केले यात टोपी, सिनेटायझर, ह्यंडवॉश , मास्क इत्यादीचा समावेश आहे  या वेळी  नगरअध्यक्ष डाॕ,स्वरुपसिह हजारी,उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,नगर सेवक सचीन दुबे,संतोश बप्पा सिरसट अॕड.मोहन भोसले सह सर्व पञकार बांधव या वेळी उपस्थीत होते  
बालाघाट प्रतिष्ठानने पत्रकार बांधवांना किट वाटप केले त्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव देशमुख प्रकाश काळे यानी बालाघाट प्रतिष्ठानचे आभार मानले

Sharing

Visitor Counter