ग्रामपंचायत कर्मचारी १९ एप्रील पासुन बेमुदत संपावरबीड जिल्हा सचिव - विकास जाधव

ग्रामपंचायत कर्मचारी १९ एप्रील पासुन बेमुदत संपावरबीड जिल्हा सचिव - विकास जाधव
केज/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचार्यांनी १५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे निवेदनदिले होते मात्र त्यांच्या मागन्या अजुन ही मंजूर न झाल्यामुळे राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीमधील ६० हजार कर्मचारी हे येत्या १९ एप्रील पासुन बेमुदत संपावरजानार आहे.या संपावर बीड जिल्यातील मोठ्या संख्येत कर्मचारी मुंबई येथील धरणे आंदोलनातसहभागी होत असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियन एनजीपी ४५११ चे जिल्हा सचिव विकास जाधवयांनी माहीती दिली आहे . ६० हजार कर्मचार्यांचा वेतनाचा प्रश्न २० वर्षापासुन प्रलंबित असुन या बाबत ग्रामपंचायत कर्मचारी १० जुलै २०१८ रोजीनागपुर येथील लाॅगमार्च व ७ जानेवारी २०१९ ला लातूर येथे भव्य अधिवेशन केले होते १० जुलै २०१८ रोजी तत्कालीन राज्यमंत्री दादा भुसे यांनी मागण्या मान्य मंजूर करण्याबाबत आश्वासन दिले होतेतसेच ७ जानेवारीला लातूर येथे ग्रामविकास मंत्री व कामगारमंत्री यांनीअधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शनकेले होते परंतु ग्रामपंचायत कर्मचार्यांच्यामागण्या संंबंधी अद्यापही निर्णय झालेला नाही त्यामुळे राज्यातील ६० हजार कर्मचारी हे विविध मागण्यासाठी १९ एप्रीलपासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदतसंपावर जानार आहेत.