रुई नालकोल येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; सरपंच संजय नालकोल यांचा स्तुत्य उपक्रम

रुई नालकोल येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; सरपंच संजय नालकोल यांचा स्तुत्य उपक्रम.
आष्टी/तुकाराम गणगे
बीड प्रसार न्युज
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक मोलमजुरी, कामगार, वीट भट्टी कामगार, छोटे-मोठे व्यवसायिक, सामान्य नागरिक यांना उद्योगधंदे, व्यापार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीआहे. यांचे दुःख जाणून तालुक्यातील रुई नालकोल गावचे सरपंच संजय नालकोल यांनी एक महिना पुरेल असे धान्य व किराणा सामान रुई नालकोल गावातील ज्या ग्रामस्थांकडे शेती नाही. त्यांना कसल्याही प्रकारची अन्नधान्याची सोय नसल्या कारणाने व हातावर पोट आहे अशा ग्रामस्थांना प्रत्येकी पंचवीस किलो तांदूळ, पंचवीस किलो गहू, एक किलो तेल, एक किलो गुळ, अर्धा किलो चहापती, अंगाची साबण, निरमा पुडा, बेसनपीठ, फरसाण, दोन किलो साखर, एक महिना पुरेल असे धान्य व किराणा सामानाचे वाटप सरपंच संजय नालकोल यांच्या तर्फे करण्यात आले. यावेळी अनिल गजघाट उपसरपंच, शरद पवार सर, परसराम धोंडे, आजिनाथ कन्हेरकर, केशव भिसे, युवराज हिंगणे, लाभार्थी आदी उपस्थित होते.
