आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या मदतीने मृत्यूच्या दारातील तांबे सुखरूप घरी परतले

आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या मदतीने मृत्यूच्या दारातील तांबे सुखरूप घरी परतले
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील 45 वर्षीय भाऊसाहेब गंगाधर तांबे या व्यक्तीला पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तांबे यांनी अहमदनगर येथे कोरोनात आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या केल्या त्यामध्ये HRTC स्कॅन केले असता त्यांचा स्कोर 24 एवढा आला होता. 25 पैकी 24 स्कोर चिंता वाढवणारा नक्कीच होता आणि ऑक्सिजन पातळी देखील 65-70 वर आली होती. रुग्णाची परिस्थिती पाहून तांबे कुटूंबियांची व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड करिता धावपळ सुरू झाली. अहमदनगर येथील एकही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने तांबे कुटुंबाची चिंता वाढत गेली. तांबे कुटुंबियांनी आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळचे सदस्य तथा चिंचाळा गावचे उपसरपंच अशोक पोकळे यांना रात्री एक वाजता कॉल करून रुग्णाबाबत सर्व माहिती दिली व आम्हाला तात्काळ बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. अशोक पोकळे यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांना फोनवर रुग्णाबाबत सर्व माहिती दिली असता आ बाळासाहेब आजबे यांनी कोरोना रुग्ण तांबे यांना आष्टीच्या कोव्हीड सेंटर मध्ये लगेच ऍडमिट करण्यास सांगितले.
आ. आजबे यांच्या आदेशानुसार संदीप सुंबरे, अशोक पोकळे, नाजीम शेख या कार्यकर्त्यांनी आष्टीचे शासकीय कोविड सेंटर गाठले व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. कोव्हीड सेंटर मध्ये एक रुग्ण मागील सहा दिवसापासून ऑक्सिजन बेडवर उपचार घेत होता. त्याची प्रकृती सुधारत होती. त्या रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना संदीप सुंबरे यांनी तांबे बाबत सर्व हकीकत सांगताच उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की आमचा रुग्ण सध्या बरा आहे आम्हाला ऑक्सिजनची सध्या तरी गरज नाही तुमचा रुग्ण सिरीयस आहे त्याला आम्ही आमच्या बेडवर जागा देऊन आम्ही जनरल बेडवर शिफ्ट होतो.
यानंतर भाऊसाहेब तांबे यांच्यावर आष्टीच्या शासकीय कोव्हीड सेंटर मध्ये उपचार सुरू करण्यात आले. 8 ते 9 दिवस उपचार घेऊन तांबे यांनी 24 स्कोर असलेल्या कोरोनाला चितपट करून त्याच्यावर विजय मिळवून आपलं घर गाठलं. भाऊसाहेब तांबे यांनी कोरोनाला न घाबरता दिलेला लढा हा उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांसाठी ऊर्जा व उर्मी देणारा नक्कीच आहे. स्कोर काहीही असो माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोरोनावर मात करता येते हे तांबे यांच्या प्रकरणातुन अधोरेखित झाले आहे. तांबे यांना उपचार देताना डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय आणि सर्व आरोग्य कर्मचारी यांचे देखील मोलाचं सहकार्य लाभले. घरी जाताना तांबे व त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी उपस्थित सरपंच अशोक पोकळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नाजीम शेख, डॉ सुषमा सुंबे मॅडम, डॉ रुपाली राऊत, नर्स यांच्यासह तांबे यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.
आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळा मुळेच आज मी हयात
कोरोना रोगाला जसे दाखवले जात आहे मुळात हा रोग असा नसून यामध्ये रुग्णाची इच्छाशक्ती प्रबळ असेल व वेळेवर योग्य खबरदारी व उपचार घेतले गेले तर हा रोग पूर्णपणे बरा होतो. माझ्या बाबतीत सर्वात जास्त स्कोर असून देखील मी या रोगावर यशस्वीपणे मात केली आहे. मला जीवनदान देण्यात आ. बाळासाहेब काका आजबे व त्यांच्या मित्र मंडळाचे अनमोल योगदान आहे. मी आज काकांमुळे व त्यांच्या मित्र मंडळा मुळेच हायात आहे.
श्री. भाऊसाहेब तांबे (कोरोना योद्धा)
