विकेंड नंतर धारूर शहरांमध्ये तोबा गर्दी ,प्रशासन हतबल नागरिकांनो आता तरी नीट वागा!

Beed

विकेंड नंतर धारूर शहरांमध्ये तोबा गर्दी ,प्रशासन हतबल नागरिकांनो आता तरी नीट वागा!
 
धारुर शहरामध्य नागरिक बिनधास्त रस्त्यावर?

किल्ले धारूर/इरफान शेख 

शहरांमध्ये आज शनिवार रविवारच्या विकेंड नंतर बाजारामध्ये तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले शनिवार रविवार कडक लॉकडाऊन होता यामुळे लोक घरातच होते परंतु पुन्हा सोमवारी ७ ते ११ या वेळेमध्ये धारूर बाजारात तोबा गर्दी दिसून आली
संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार ,रविवार विकेंडला कडक लॉक डाऊन असते यामुळे कुठलीही खरेदी नागरिकांना करता येत नाही परंतु आज सोमवारी सात ते अकरा या वेळेत जीवनावश्यक खरेदीच्या वेळेमध्ये नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केली प्रशासनाने गर्दी होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता परंतु आज प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून आले पोलीस प्रशासन नगरपरिषद प्रशासन गर्दी आवरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत होते
नागरिकांनो आता तरी नीट वागा तुमच्या चुकीची सजा आज महाराष्ट्र भोगतोय आता तरी नियम पाळा गर्दी करू नका .जीवनावश्यक वस्तू नाही तर जीवनच आवश्यक आहे याचे भान सगळ्यांनी ठेवा असे प्रशासन ओरडून सांगत होते
पोलीस प्रशासन नगरपरिषद प्रशासन यांनीही आता कोणाचीही तमा न बाळगता पोलीस प्रशासनाने  नियमांचे भंग करणार्‍यांच्या विरोधात दंडुका उगारलाच पाहिजे तरच या मोकाट फिरणाऱ्याची गर्दी कमी होईल. नगरपरिषद प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कडक दंड लावून त्यांना शिस्त लावावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे

Sharing

Visitor Counter