हेल्मेट ची सक्ती फक्त सामान्य जनतेलाच ?

हेल्मेट ची सक्ती फक्त सामान्य जनतेलाच ?
बीड/प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे लाॅकडाऊन काळातील आत्यावशक मध्ये फिरणाऱ्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक राहील असा आदेशात म्हटले आहे .परंतु हा आदेश फक्त सामान्य जनतेलाच आहे का? असा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे.लाॅकडाऊन च्या परिस्थितीत लोक दोन वेळेस च्या जेवणासाठी परेशान आहेत आणि अश्या प्रस्थिती हेल्मेट आणायचं कुठुन?असा प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहे.
आदेश फक्त सामान्य जनतेलाच आहे का?पोलीसांसाठी नाही का? असा प्रश्न सामान्य जनतेतून उद्धभवत आहे , नियम तो नियम सर्वाना सारखाच पाहिजे , एकाला एक आणि एकाला एक असे ,नको अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
एवढी महामारी कोरोना सारख्या रोगाची सुरू आहे , त्यालाच लोक वैतागून गेले आहेत ,अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे,आणि त्यातच या हेल्मेटसक्ती चा सामान्य जनतेच्या खिशाला झळ ,कोठून आणायचे पैसे ? एकतर काम एकही रुपयाचा नाही त्यातली त्यात प्रशासनाने लावलेली सकती आत्यावशक मध्ये येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट ची सुट देण्यात यावी आशी मागणी नागरिकांकडून होत आहेत.
