प्राथमिक आरोग्य केंद्र बनताहेत कोरोना हॉटस्पॉट , ऑनलाइन रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जातच नाही --डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर

प्राथमिक आरोग्य केंद्र बनताहेत कोरोना हॉटस्पॉट , ऑनलाइन रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जातच नाही --डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर
बीड (रिपोर्टर -गोरख मोरे )
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीमुळे हॉटस्पॉट बनले असून लसीकरणासाठी येणारे ग्रामस्थ कोरोना सोबत घेऊन जातात की काय , अशी सोशल डीष्ट सिंगचे नियम पायदळी तूडवल्यामुळे परिस्थिती निर्माण झाली असून ऑनलाइन रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा होताना दिसत आहे .
लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील नागरिक लसीकरण नाव नोंदणीसाठी गर्दी करत आहेत , अपुरे कर्मचारी असल्याकारणाने ढिसाळ नियोजन , दिसत असून अधिकारी -कर्मचाऱ्यांचा लसीकरण नोंदणीसाठी जमा झालेल्या ग्रामस्थांना सोशल डीस्ट सिंगचे नियम सांगूनही उपयोग होताना दिसत नाही , त्यातच कर्मचाऱ्यांनी आग्रह धरलाच तर ग्रामस्थ हमरीतुमरीवर येताना दिसतात , त्यामुळेच ते सुद्धा जास्त समजावण्याच्या भानगडीत पडताना दिसत नाहीत .
ऑनलाइन रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जात नाही , त्यामुळेच जास्त गर्दी , संसर्गाचा धोका जास्त --डॉक्टर ढवळे
प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येणारांची गर्दी होऊ नये तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी व्हावा म्हणून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचे शासनाचे आदेश आहेत , परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनलाईन रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जात नसून प्रत्यक्ष नाव नोंदणी करून टोकन घेऊन जावे लागत आहे , एका व्यक्तीला ४ व्यक्तींची नोंदणी करण्याची मुभा आहे , त्यामुळेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन चा काहीच उपयोग नसल्याचे दिसून येते
