महाराष्ट्र शासनाची मोफत गहू-तांदूळ योजना कागदावरच

महाराष्ट्र शासनाची मोफत गहू-तांदूळ योजना कागदावरच
जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार --डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर
बीड (रिपोर्टर -गोरख मोरे )
महाराष्ट्र शासनाने गरीब व गरजू लोकांना लॉकडाउन कालावधीत जाहीर केलेले धान्य स्वस्त धान्य दुकानावर उपलब्ध करून गरीब जनतेची उपासमार होऊ नये यासाठी केलेली घोषणा आठवडा उलटला तरी कागदावरच असून गोडवन मधुन धान्यच आले नसल्यामुळेच वाटप करण्यात आले नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदार आणि बोलून दाखवले , गोडाऊन कीपर आज-उद्या करत लांबन लावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून तात्काळ गोडावून मधूनच धान्य वितरित करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी , जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांना तालुका पुरवठा अधिकारी , तहसीलदार बीड यांच्यामार्फत डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे .
कोरोना संकटामुळे लॉकडाउन झालेल्या जनतेला राज्यातील महा विकास आघाडी सरकारने रेशन दुकानावर ३ किलो गहू २ किलो तांदूळ प्रति व्यक्ती देण्याचे जाहीर करून आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे तरीसुद्धा अद्याप ग्रामीण भागामध्ये धान्य रेशन दुकान वर आलेले नाही , रेशन दुकानदारांच्या मते अजून गोडवान मधूनच धान्य आले नाही , आल्या नंतर वाटप करू .
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे एकूण ३ स्वस्त धान्य दुकाने असून एकूण ७०० च्या आसपास रेशन कार्ड आहेत , चौसाळा येथील गोडाऊन मधून त्यांना धान्य वाटप होते , परंतु चौसाळा गोडावून कीपर आज -उंद्या वाटप करू म्हणत आठवडा उलटून गेला असून सध्या संचार बंदी च्या काळात ग्रामस्थांचे उपासमार होत असून तात्काळ पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात यावा , अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी ई-मेल द्वारे केली आहे .
