सत्यम शिवम उद्योग समूहाचे जिजाई मसाले या कंपनीला मा.आ.भीमसेन धोंडे यांनी दिली सदिच्छा भेट

सत्यम शिवम उद्योग समूहाचे जिजाई मसाले या कंपनीला मा.आ.भीमसेन धोंडे यांनी दिली सदिच्छा भेट
आष्टी/वार्ताहर
बावी ता.आष्टी येथील युवा उद्योजक बाबूभाई गर्जे यांनी नव्याने स्थापन केलेल्या सत्यम शिवम उद्योग समूहाचे जिजाई मसाले या कंपनीला आष्टी, पाटोदा, शिरुर का. विधानसभा मतदारसंघाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी दिली सदिच्छा भेट.
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बोलले जाते परंतु आता काळ बदलत असून नविन पिढी उच्चशिक्षण घेऊन जिल्ह्याची ओळख नव्याने निर्माण करताना दिसून येत आहेत याचे उदाहरण म्हणजे आष्टी तालुक्यातील बावी या छोट्याशा गावातील बाबूभाई गर्जे या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने ग्रामिण भागात सत्यम शिवम उद्योग समूह स्थापन करत जवळपास दिड कोटी रुपये खर्च करुन जिजाई मसाले नावाने एक महिन्यापूर्वी स्वतःची कंपनी स्थापन केली. नव उद्योजक बाबूभाई गर्जे या युवकाचे निर्भीड कार्य कौतुकास्पद असल्याने भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी आज जिजाई मसाले या कंपनीला भेट देऊन बाबूभाई गर्जे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करत या कंपनीची सर्व माहिती घेऊन त्यांच्या कार्याबद्दल विशेष कौतुक केले.
यावेळी मा.आ.भीमसेन धोंडे यांच्यासह जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे हे उपस्थित होते तर मा.आ.धोंडे साहेब यांचे स्वागत संचालक बाबूभाई गर्जे यांनी केले.
