व्यवस्थित नियोजन करूण कामे करा अन्यथा सस्पेंन्ड

व्यवस्थित नियोजन करूण कामे करा अन्यथा सस्पेंन्ड
आढावा बैठकीत आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचा प्रशासनाला ईशारा
गेवराई/वार्ताहार
गेवराई उपजिल्हा रुग्णलयात आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट दिली व आढावा बैठक घेतली यावेळी योग्य नियोजन करा वरिष्ठ यांच्याशी सन्मन्वय करून चांगले आणि उत्तम नियोजन करावे अन्यथा सस्पेंड करील असा ईशारा या आढावा बैठकीत आयुक्त केंद्रेकर यांनी दिला आहे .
आढावा बैठकीत मार्गदर्शन व सुचना देताना ते बोलत होते यावेळी जिपचे मुुख्यकार्यकारी अधीकारी अजित कुंभार , बीड पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी , आ लक्ष्मण पवार , तहसिलदार सचिन खाडे , वैधकीय अधीक्षक महादेव चिंचोळे , तालुका वैधकीय अधीकारी संजय कदम , डॉ राजेश शिंदे , डॉ प्रविण सराफ ,गटविकास अधीकारी एडी सानप , तहसिलदार प्रशांत जाधवर , मख्याधीकारी उमेश ढाकणे यांची या बैठकित उपस्थित होते .
पुढे बोतना ते म्हणाले की आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता सगळीकडे आहे रूग्ण तपासाता त्यात त्या ऑक्सिमीटरव्दारे तपासणी करावी त्या रुग्णांला किती ऑक्सिजन लागतो तेवढेच ऑक्सिजन त्या रुग्णाला द्या मोठमोठाले सिंडेन्डर लावुन ऑक्सिजन वर्थ वाया जाऊ नये यांची वैवस्थित काळजी घ्या अचुक नियोजन तसेच वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करा अडचण असेल तर तीच्यावर मात कशी करता येईल .हे तपासा उगाच काही करू नका ज्यांनी नियोजन केले आहे त्यांना कशाचीही कमतरता भासनार नाही ऑक्सिजन बाबद यांचा वापर काटकसरीने करा अन्यथा चुक माझ्या निदरर्शनास आल्यानंतर कुणालाही माफी दिली जाणार नाही मी कसलाही विचार न करता डायरेक्ट सस्पेंड करील असा ईशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे जवळपास एक तास ही बैठक चालु होती या नंतर त्यांनी उपजिल्हा रूग्णयात पाहणी करूण परिस्थिती जानुण घेतली .
मात्र आयुक्त यांच्या दौ-यामुळे अधीकारी कर्मचारी यांच्यात चांगलीच धादल उडाली होती.दरम्यान गेवराईच्या उपजिल्हा रूग्णलयाची पाहणी आयुक्त यांनी केली त्यावेळी अनेक चुका त्यांच्या निर्दशनास आल्या याठिकाणी खुप समस्या आहेत यांची जाणिव त्यांनी आरोग्य विभाग यांना करूण दिली तसेच केलेल्या सुचनेचे तात्काळ पालन करूण अमलबजावनी करावी अश्या कडक शब्दात त्यांनी यंत्रनेला सुनावले आहे .