लिंबागणेश प्राथमिक आरोग्य पोलीस बंदोबस्तात लसीकरण, सावलीसाठी मंडप, चहा पाण्याची ग्रामपंचायत मार्फत सुविधा--डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर

लिंबागणेश प्राथमिक आरोग्य पोलीस बंदोबस्तात लसीकरण, सावलीसाठी मंडप, चहा पाण्याची ग्रामपंचायत मार्फत सुविधा--डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर
बीड (रिपोर्टर-गोरख मोरे )
लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार रोजी पोलीस बंदोबस्तात टोकण पद्धतीने लसीकरण सुरळीत पार पडले, ग्रामपंचायत मार्फत सावलीसाठी मंडप, तसेच चहापाण्याची सोय करण्यात आली होती, लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .
दिनांक ११ मे मंगळवार रोजी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतिमा रकटे यांच्या मार्गदर्शनात दुसरा लसीकरण डोस व ४५ वर्ष वरील एकूण ४०० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले, या वेळी लसीकरण उपक्रमास आरोग्य सहाय्यक गोरमाळी, जाधव सी डी, भांडवलकर, औषधी निर्माता कचार, आरोग्य सेविका गिरे, चौरे, बहिरवाल, उंडाळे, सोनवणे, सापते, आशा वर्कर्स मीरा वैद्य, योगिनी शेळके, परिचर सचिन जाधव, मीना वडमारे आदींनी नोंदणी केलेल्या ग्रामस्थांचे टोकन नंबर प्रमाणे सोशल डीस्ट् सिंग आदी नियमांचे पालन करत लसीकरण करण्यात आले .
ग्रामपंचायत मार्फत सावलीसाठी मंडप, चहा पाण्याची व्यवस्था, दुकानदार, भाजीपाला फळ विक्रेते, यांची ऑंटीजेन तपासणीची मागणी --डॉक्टर गणेश ढवळे
सध्या मे महिन्यातील कडक उन्हामुळे लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांना उन्हात ताटकळत उभी राहू नये यासाठी सरपंच निकिता स्वप्निल गलधर, भाजप नेते स्वप्निल गंधार, यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच शंकर वाणी, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मोरे, सुखदेव वाणी, गणेश थोरात यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सावलीसाठी मंडप तसेच लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांना ग्रामस्थांना जार च्या थंड व शुद्ध पिण्याच्या तसेच चहा पाण्याची सोय करण्यात आली होती, याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतने यापूर्वी वारंवार सोडियम हाय पो क्लोराईड, फवारणी, मिशन डेथ, झिरो उपक्रम अंतर्गत ऑक्सी मीटर, थर्मल गंन , शनि टायझर, मास्क, यांचे वाटप करण्यात आलेले असून वाढता कोरोना चा संसर्ग पाहता दुकानदार, भाजीपाला फळ विक्रेते, यांची अँटी जेन तपासणी करण्याची मागणी केली आहे .
लिंबागणेश पोलिस बंदोबस्तात लसीकरण शांततामय वातावरणात पार पडले
मागील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झालेल्या गर्दीचा अनुभव पाहता आज लिंबागणेश पोलीस प्रशासन पोहे एस एन पारधी, एस डी राऊत, पो ना एस एम सोनवणे, एस एस सानप, आर जी ढोबळे, होम गार्ड आय ए उबाळे, जी व्ही कुलकर्णी, यांनी राखलेला चोख बंदोबस्तामुळे शांततामय वातावरणात लसीकरण पार पडले, त्यामुळे इतर वेळी दिसणारा गडबड गोंधळ या वेळी दिसून आला नाही .
