महावितरण कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार ! माणसाच्या जिवाशी खेळण्याचा पर्यंत?

Beed

महावितरण कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार ! माणसाच्या जिवाशी खेळण्याचा पर्यंत?

चक्क लाईटिचा पोल माणसाचा जीव घेण्याच्या मार्गावर ; महावितरण कर्मचाऱ्यांना भान नाही?

बीड/प्रतिनिधी

कोरोणाच्या या  पार्श्वभूमीवर लोक खुप वैतागले असुन माणसाच्या मनात एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरी कडे महावितरण कर्मचारी देखील कोरोना पेक्षा ज्यास्त प्रमाणात माणसाच्या मनात भितीची वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.कारण जालना रोडवरील काझी नगर भागात वार्ड क्रमांक १ मधील
चक्क विद्युत प्रवाह करणारी तारेच्या  लाईनचा पोल पुर्णपणे सडुन त्यात छिद्रे झाली व पोल वाकला आहे व तो पोल कधी ही पडु शकतो अश्या अवस्थेत आहेत.
यामुळे जिवित हाणी होण्याची दाट शक्यता असुन देखील याकडे दुर्लक्ष केलं जात आहे वारंवार महावितरण कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांकडून तक्रार करून देखील महावितरण वेगवेळे कारणे देत आहे.तर अता सांगतात की
लाॅकडाऊन असल्यामुळे पोल टाकु शकत नाही  स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे महावितरण कर्मचाऱ्यांना याचा गांभीर्य दिसत नाही?असा प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहे. जर यामुळे मोठी दुर्घटना झाली तर याचा जिम्मेदार कोण असेल? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे .ह्या  पोल च्या शेजारी बिल्डींग आहे लोक राहतात या पोल खाली मुल खेळत असतात यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना होण्यास कोणीही टाळु शकत नाही.

 

Sharing

Visitor Counter