"बीड जिल्ह्यातील त्रिमूर्ती यांचे कार्य प्रशंसनीय"!

"बीड जिल्ह्यातील त्रिमूर्ती यांचे कार्य प्रशांसनीय"!
"बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार,बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात"
इतिहासातील पहिले युद्ध जे सैन्याशिवाय लढले जाणारे
आजपर्यंतच्या इतिहासात आपण युद्ध लढले व महायुद्ध पाहिले पण सैन्याशिवाय व शस्त्र-अस्त्र शिवाय लढले जाणारे आजच्या किंवा आज ज्यांचे वय १००वर्ष असेल त्यांच्या हयातीतील हे पहिले युद्ध असेल ज्यात जो शत्रु अदृश्य अज्ञात असेल तर दैविक शक्ति शिवाय त्यांच्याशी दोन हात करून पराभूत करण्याची क्षमता सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेरची बाब आहे असे मला तरी वाटत आहे.
जगात थैमान घालणाऱ्या कोरोना कोवीड १९ या संसर्गजन्य अदृश्य न दिसणाऱ्या जीवघेण्या व अवघ्या जगात त्राही-त्राही करून सोडणार्या या आजारावर इतक्या लवकर प्रतिबंधित लस किंवा उपाय शोधण्यात खूप अवधी लागेल तोपर्यंत जगात हाहाकार व मृत्यूचे तांडव उडालेले असेल या वर उपाय जर काय असतील तर हे प्रशासनातील जबाबदार धुरीण व आपल्या देशातील स्वातंत्र्य लोकशाहीतील अति स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे आपण सर्व समाज बांधव वरवर दिसणाऱ्या या अदृश्य शत्रूला आजपर्यंत आपण गांभीर्याने घेतलेले नाही याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात या आजाराने अजून प्रवेश केलेला नाही व करायला ही नाही पाहिजे त्यासाठी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी आपण सर्वांना कठीण दिव्य करावे लागणार असून ते म्हणजे आपल्या संयम व दोन हात करण्यापेक्षा आपले दोन हाताचा वापर न करता हाताची घडी घालून तोंड बंद ठेवून या अदृश्य शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवणे, माणसामाणसांमध्ये ३.२५ फुट अंतर ठेवून प्रगल्भतेने व जबाबदारीने वागणे होय.
प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी व डॉक्टर नर्सेस ब्रदर्स पोलीस अधिकारी व पोलिस हे ही माणसेच असतात त्यांनाही आपलं कुटुंब व तेही कुटुंब प्रमुख असतात तेव्हा आपण सर्वांना आम्ही हात जोडून वारंवार विनंती करत आहोत सुरक्षित रहा सय्यमात राहा संयम बाळगा प्रचंड कसोटीचा काळ आहे आणि आज तरी त्याशिवाय आपणाकडे दुसरा तरणोपाय नाही.
प्रशासन व प्रशासनातील जबाबदार जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,व जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक थोरात , सर्व डॉक्टर, नर्सेस ,ब्रदर्स या सर्वांना मदत करणारी सुज्ञ नागरिक या कसोटीच्या काळावर मात करू व आपण "आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे नाव व देशाचे संपूर्ण जगात नाव करूया
महासत्ता बनण्याची स्वप्न परत साकार करूया व घरातच राहू या".
स्वच्छता ठेवूया व प्रशासनास सहकार्य करूया या आपण सर्व मिळून हि शपथ घेऊया "सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा,हम बुलबुलें हैंइसकी,ये गुलसिताँ हमारा" .
