खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे - राजेंद्र सुपेकर

Ashti

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे - राजेंद्र सुपेकर

आष्टी / प्रतिनिधी  
बीड प्रसार न्युज

 कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येणा-या खरीप हंगामात शेतक-यांनी सर्तक रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.
   याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुपेकर यांनी म्हटले आहे की , कोरोनाच्या सावटाखाली आपण खरीप हंगामाच्या उंबरठयावर उभे आहोत. कोरोनाचे दिर्घकालीन परिणाम शेती, शेतकरी, अर्थकारण यावर दिसतील यात शंका नाही. शेतक-यांनी येत्या खरीप हंगामात एक पिक ऐवजी बहुपिक पध्दतीचा अवलंब करावा. कडधान्य,तृणधान्य,गळितधान्य,चारापिके व भाजीपाला पिके यांचा समावेश पिक नियोजनात करावा. कमी खर्चाच्या  तंत्रज्ञानाचा अवलंब करावा .कडधान्ये म्हणजेच तुर, उडिद, मुग या पेरणी करीता सुधारीत जातीचे बियाणे वापरावे. बाजरी व मका या पिकांचे सुधारीत व संकरीत वाण वापरावेत. ज्या शेतक-यांकडे स्वतःच्या शेतातील पिकवलेल्या तुर,मुग,उडिद व सोयाबीनचे बियाणे असेल त्यांनी स्वच्छ करुन उगवण क्षमता तपासुन उत्तम उगवण क्षमता असणारे बियाणे बीजप्रक्रिया करुन पेरावे. मिश्र व आंतरपिक पध्दतीचाअवलंब करावा. पुरेसी ओल झाल्यानंतर पेरणी करावी. पिकांना पेरणी करताना योग्य ती रासायनिक खते पेरणी बरोबर द्यावीत. 
किडीचे व्यवस्थापन एकात्मीक किड व्यवस्थापन पध्दतीने करावे. हुमणी, लष्करीअळी, गुलाबी बोंडअळी या किडीचा जीवणक्रम समजुन घेवुन योग्य वेळी किडव्यवस्थापन उपाय योजावेत. निबोळीचा वापर
करुन सुरुवातीच्या काळात किडीचे कमी किंमतीत व कमी खर्चात व्यवस्थापन करणे शक्‍य आहे. वेळोवेळी कृषी विद्यापीठे कृषी विभाग, प्रगतशिल शेतकरी यांचे प्रसार माध्यमातुन प्रसिद्ध होणारे शेती विषयक संदेश आपल्या पिक संगोपनासाठी वापरावेत. शेतातील पिकांच्या किड व रोग संरक्षणावर भर दयावा व आवश्यकतेनुसार उपाय योजना कराव्यात. कमीत कमी खर्चात पिक घेण्यावर भर दयावा व खरीप हंगाम यशस्वी करावा.
 शेतकरी गट, शेतकरी कंपन्या व कृषि निवीष्ठा विक्रेते यांनी परस्पर समन्वयातुन बियाणे,खते व किटकनाशके यांच्या खरेदीस्तव गर्दी न करता बांधावर या निवीष्ठा उपल्बध करणेस्तव प्रयत्नशिल रहावे असे आवाहन सुपेकर यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter