अस्वच्छतेने मठ गल्लीत डेंग्यूची साथ पसरली! नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Dharur

अस्वच्छतेने मठ गल्लीत डेंग्यूची साथ पसरली!
नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन 

किल्ले धारूर/इरफान शेख

धारूर शहरातील मठ गल्लीत घाणीचे साम्राज्य पसरले आहेत नालीचे रूपांतर गटरात झाले आहे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे यामुळे या भागात डेंग्यूची साथ पसरली आहे वेळोवेळी तोंडी लेखी निवेदन देवून देखील नगरपरिषद गांभीर्याने घेत नसल्याने येथील नगरसेविका सौ राजश्री खामकर व नगरसेवक सतींदर गोन्ने यांनी जिल्हाधिकारी रेखावर यांना निवेदन दिले आहे.

लेखी दिलेल्या निवेदनात नगरसेवकांनी येथील भागातील समस्यांचा पाढाच वाचला आहे नगरपरिषदेने या भागात नालीचे काम, रस्ता मजबुतीकरण ही कामे केली नाहीत तसेच सहा महिन्यातच मुख्याधिकारी बदल असल्याने देखील अडचणी येत आहेत नगरपरिषदेने या भागातील स्वच्छते बाबतीत पूर्ण पणे दुर्लक्ष केले आहे वर्तमान बातम्या प्रकाशित होताच भंगार फॉगिंग मशीनची फवारणी केलेले फोटो टाकून जनतेची दिशाफुल केल्याचे नगरसेवकांनी आरोप केला आहे या भागातील पाण्याचे तळे साचत आहेत नाल्या वेळीच साफ न केल्याने रस्त्यावर पाणी येत आहे सर्वत्र घान असल्याने तीन रुग्णांचे डेंग्यू रिपोर्टर पाजीटीव्ह आले आहेत.
ही डेंग्यूची साथ शहरात पसरण्याचा धोखा निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी यानी वेळीच लक्ष देवून आवश्यक त्या सूचना देण्याची मागणी होत आहे.

Sharing

Visitor Counter