सरपंच संतोष भैय्या चव्हाण यांच्या पुढाकाराने स्वस्त धान्य दुकानदारांकडून गहु, तांदूळ, साखरचे प्रत्यक्ष गावात वाटप

Ashti

सरपंच संतोष भैय्या चव्हाण यांच्या पुढाकाराने स्वस्त धान्य दुकानदारांकडून गहु, तांदूळ, साखरचे प्रत्यक्ष गावात वाटप

लाभार्थींकडून नियम, शिस्तीचे काटेकोर पालन

आष्टी/प्रतिनिधी.
बीड प्रसार न्युज.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून खबरदारी घेतली जात असून धान्याचे वाटप करताना लाभार्थींना रेखाटलेल्या सर्कलमध्ये रांगेत उभे करून सामाजिक अंतर नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावू नये. याकरिता राज्य सरकारबरोबरच प्रशासकीय यंत्रणा विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असतानाच कासारी, रुटी,ईमनगाव,खनापुर सोलेवाडी येथेही सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार एजाज शेख यांनी  खबरदारी घेत शासनाने दिलेल्या नियमानुसार मोफत पाच किलो तांदूळ, दरमहाचा तांदूळ, गहु,आणि अंत्योदय कुपनधारकांना साखर चे प्रत्यक्ष गावामध्ये जाउन वाटप केले . या दुकानदारांनी लाभार्थींना धान्य वाटप करताना एक मिटर अंतर ठेऊन वर्तुळ रेखाटण्यात आले आहेत. त्यासोबत प्रत्येकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे महिला, पुरुष त्या सर्कलमध्ये रांगेत सामाजिक अंतर नियमांचे पालन करुन धान्य घेताना दिसत आहेत. शिस्त अन् नियमाचे उत्तम उदाहरण याठिकाणी पाहायला मिळाले. स्वस्त धान्य दुकानदारांचा आदर्श इतरांनीही घेतल्यास त्या गावापासून कोरोना संसर्ग नक्कीच कोसो दूर राहिल्याशिवाय राहणार नाही. यावेळी सरपंच संतोष भैय्या चव्हाण, पत्रकार तथा ग्राप सदस्य दादासाहेब बन, ग्रामसेवक बाळासाहेब थोरवे, माजी सरपंच सुर्यभान बन, जालींदर सोमासे, माजी उपसरपंच राजेंद्र बन, शाळेच्या मुख्याध्यापिका धोंडे मँडम, जिवडे मँडम,आशासेविका सौ संगिता बन आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter