बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कट्टे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे : नगरसेवक अमर जैनोद्दीन जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Beed

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कट्टे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे : नगरसेवक अमर जैनोद्दीन
जिल्हाधिकारी यांना  दिले निवेदन

बीड/सय्यद इरफान

गेल्या दोन महिन्यापासून बीडचे मा.जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक हे अत्यंत चांगले काम करत असुन स्तूती करावे तेवढे कमी, तर दुसरीकडे बीड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गुट्टे हे गेल्या अनेक दिवसापासून स्वतःची मनमानी करून बीड शहरातील भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांना जाणून बुजून त्रास देऊन शहरातील वातावरण खराब करण्याचे काम करीत आहे .
कोरोना महामारी मुळे शहर दोन महिन्यापासून प्रशासनास सहकार्य करत असून मुख्याधिकारी  जबरशाही करून आपला रुबाब दाखवतात.  जर त्यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे त्यांनी कार्यवाही करावी पण त्यांना मेडिकल स्टोअर चे मालक,  फळविक्रेते, भाजीविक्रेते व्यापारी यांना मारण्याचा अधिकार नाही ,इतकेच नव्हे तर कोरोणा सारख्या माहामारीत लोक अन्नधान्यासाठी वन वन फिरत आहेत बीड चे मुख्य अधिकारी हे भाजी फळे विक्रेते यांचे वसतु उद्ध्वस्त करून नालीत फेकून देत आहे.

गेल्या अनेक दिवसापासून बीड नगरपरिषद चे मुख्य अधिकारी गुट्टे हे नेहमीच वादात  असतात अनेक कारणाने त्यांचे वर्तन पण पत्राकात  प्रसिद्ध सूतध्दा झाले आहे असे मुख्य अधिकारी शहरातील वातावरण खराब करण्याचे काम जर करत असेल तर अश्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे असे नगरसेवक अमर जयनोद्दीन  यांनी निवेदनात म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter