व्यापारी संघटनाने केले आभार व्यक्त
Parali
व्यापारी संघटनाने केले आभार व्यक्त
परळी/प्रतिनिधी
परळी बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे परंतु लॉककडाऊनच्या पार्श्वभूमीवर सकाळी ७ ते ९:३०वाजेपर्यंत व्यवसाय करणे कठीण झाले होते म्हणून राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेबांना दि.१०/०५/२०२०रोजी विविध व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापार करण्यासाठी अपुरा वेळ मिळत आहे म्हणून वेळ वाढवून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.
आदरणीय साहेबांनी याची दखल घेऊन आज दि.१३/०५/२०२०पासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यापार करण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे.
त्याबद्दल पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब व जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांचे जाहीर आभार.विविध व्यापारी महासंघ, परळी, वैजनाथ .