वडवणी तालुक्यातील सहा वर्षीय चिमुकलीचा खुन !

Wadwani

वडवणी तालुक्यातील  सहा वर्षीय चिमुकलीचा खुन !

वडवणी/प्रमिला माळी

वडवणी शहरात एका सहा वर्षीय मुलीचा खून करण्यात आला असल्याची खळबळजनक घटना आज मंगळवार दिनांक 12 रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून अमृता गणेश शिंदे वय सहा वर्ष राहणार वडवणी असे या मयत मुलीचे नाव आहे.

वडवणी येथील फूल विक्रेते गणेश शिंदे यांची सहा वर्षाची मुलगी अमृता ही चिंचोटी रोडवर असलेल्या घरासमोर खेळत असताना सकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता झाली स्वभावाची भोळसर व अशक्त असल्याने कुटुंबाने आसपासच्या परिसरात शोधाशोध केली.मुलगी सापडत नसल्याने शिंदे कुटुंबाने पोलिसात धाव घेत फिर्याद नोंदवली मंगळवारी दुपारी तिचा मृतदेह घराशेजारी आढळून आला घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली होती. तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी अंबाजोगाई येथील घेऊन जाण्यात आल्याची माहिती समोर येत आहे तरी सहा वर्षीय  मुलीचा घात की अपघात झाल्याची चर्चा होत आहे याप्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात  आला असुन प्रकरणाचा तपास पुढील चालु आहे.

Sharing

Visitor Counter