विधायक कार्यासाठी शफिक भाऊ सदैव तयार;मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा !

Beed

विधायक कार्यासाठी शफिक भाऊ सदैव तयार;मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा !

मोठ्या मराठा भावासह छोट्या मुस्लीम भावाला ही आरक्षण मिळावे - ॲड. शेख शफिक भाऊ

बीड/प्रतिनिधी

शिवसंग्राम मराठा क्रांती संघर्ष मोर्चा तर्फे मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक़ भाऊ यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देऊन मोठ्या भावाच्या रूपात असलेल्या मराठ्यांसह छोटे भाऊ असलेल्या मुस्लिमांनाही आरक्षण मिळावे असे यावेळी म्हणाले.
सर्वसामान्य जनतेसाठी विधायक कार्य करतांना पक्ष कोणताही असो, शफिक भाऊ विधायक कार्याचे समर्थन करण्यासाठी  जनसामान्यांसाठी सदैव तयार असतात. त्यांच्या याच खुबी मुळे ते स्वपक्षासह इतर राजकीय पक्षातही आवडते व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या याच व्यक्तिमत्त्वाचा परिचय पुन्हा एकदा बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. शिवसंग्राम मराठा क्रांती संघर्ष मोर्चाने मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन केले. यामध्ये भाऊंनी जातीने सहभागी होत आंदोलनस्थळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठे आमचे मोठे भाऊ आहेत. मोठ्याला आरक्षण द्यायलाच हवे शिवाय लहान भाऊ असलेला मुस्लिम समाजही आरक्षणापासून वंचित राहता कामा नये. याकरिता मोठ्या भावासह छोट्या भावालाही आरक्षण मिळावे म्हणून एआयएमआयएम पक्ष सदैव प्रयत्न करीत राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मराठा आणि मुस्लिम यांच्या आरक्षणासाठी मागणी करून आंदोलने करणारा पक्ष कोणताही असो या मुद्द्याला एआयएमआयएम पक्ष सदैव समर्थन देत राहील. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. भाऊंचे हे मनोगत ऐकून आंदोलन स्थळी उपस्थित सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या मनोगताचे अभिनंदन करून आभार मानले. यामुळे शफिक भाऊ विधायक कार्यासाठी सदैव तत्पर असतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली

Sharing

Visitor Counter