आष्टीत अडकलेल्या मजूरांना आ.धस,आ.आजबे यांनी केली मदत

आष्टीत अडकलेल्या मजूरांना आ.धस,आ.आजबे यांनी केली मदत
तहसिलदार यांच्या उपस्थितीत पाठवले गावाकडे
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
पुणै जिल्ह्यातील यवत येथील एका खासगी गुराळावर कामाला असलेल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि सोनपेठ येथील मजूर खडकतपर्यंत आले असता या मजूरांच्या मदतीला आ.सुरेश धस धावुन आले. त्यांनी तहसीलदार निलिमा थेऊरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून मूळ गावी जाण्यास परवानगी दिली.दि.१२ मे रोजी यवत येथून राठोड,आडे ,मासाळकर, या कुटुंबातील १८ पुरुष १८ महिला आणि ५ लहान मुले असे ४१ मजूर असलेले समावेश होता.हे मजूर श्रीगोंदा मार्गे खडकतला आले असताना जामखेड हद्दीमधील पोलिसांनी त्यांना अडवले. आष्टी तालुक्याच्या हद्दीमध्ये आणून सोडले. हे समजताच या मजूरांना भेटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे यांनी मजुरांची व्यथा आ. सुरेश धस यांना कल्पना दिली.आ.धस यांनी ताबडतोब दखल घेत आष्टी येथे आणले.यावेळी खडकत येथील सरपंच उदमले,तलाठी गौतम ससाणे,विजय पाटील,बापू जेवे, रघुनाथ पवार यांनी या मजूरांची व्यवस्था करून आष्टीला आणले.आष्टी येथे सुरक्षित स्थळी छत्रपती शाहू महाराज अपंग निवासी विद्यालयात सोय केली. या मजुरामधील दोन महिला गरोदर असल्याने वैद्यकीय तपासणी यावेळी आज या सर्व मजूरांचा परवाना पास तयार करून जयदत्त प्रतिष्ठानच्या मिनी बसद्वारे या मजूरांना सोनपेठ आणि गंगाखेड येथे पाठवण्यात आले.या मजुरांच्या प्रवासासाठी काही रक्कम आ.धस यांनी रक्कम दिली.आ.बाबाजानी दुर्राणी, गंगाखेड राम प्रभू मुंडे,सोनपेठचे पालप्रसाद मुंदडा यांच्याशी संपर्क साधून मजुरांविषयी कल्पना दिली.यावेळी तहसिलदार निलिमा थेऊरकर,अध्यक्ष सुखदेव पोकळे,सुनिल रेडेकर,मंडळ अधिकारी शिवशंकर शिंगनवाड, तलाठी गौतम ससाणे,तलाठी निर्मल चव्हाण,नन्नवरे सर हे उपस्थित होते.या मजूरांना निरोप देताना आ.बाळासाहेब आजबे,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,पत्रकार उत्तम बोडखे, पत्रकार शरद तळेकर उपस्थित होते.