नगरपरिषदेला नागरिकांनी घेराव घालताच स्वच्छतेच्या कामांना सुरुवात

नगरपरिषदेला नागरिकांनी घेराव घालताच स्वच्छतेच्या कामांना सुरुवात
मुख्याधिकारी व आरोग्य विभाग कसबा विभागात तळ ठोकून
किल्लेधारूर/प्रतिनिधि
आज धारूर शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी नगरपरिषदेला धारूर शहरातील स्वच्छतेच्या कामाबाबत घेराव घातला कसबा विभागातील मठ गल्ली व आसपासच्या परिसरात डेंग्यू रुग्ण आढळले आहेत या भागात अस्वच्छता असल्याने आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे
याबाबत नगरपरिषदेने स्वच्छतेची कामे करावीत, कोरडा दिवस पाळावा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करू नये यासाठी मुख्याधिकारी सुहास हजारे यांना घेराव घातला.
मुख्याधिकारी यांच्या आदेशाने लागलीच मठ गल्लितील स्वच्छतेच्या कामना सुरुवात करण्यात आली मुख्याधिकारी व आरोग्य विभाग सद्या मठ गल्लीत तळ ठोकून आहेत शहरात इतरही ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे याबाबत कार्यवाही करण्याची मागणी शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषद सर्वोतपरी सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यधिकारी सुहास हजारे यांनी सर्वांना दिले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष माधव निर्मळ, शिवसेना तालुका अध्यक्ष नारायण कुरुंद, राजाभाऊ शेटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन शिनगारे, गटनेते सुधीर शिनगारे, गणेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय शिनगारे, बापू खामकर व इतर नागरिक उपस्थित होते
