लिंबागणेश भालचंद्र माध्यमिक विद्यालयासमोर डीव्हायडरवर गाडी चढुन अपघात,जिवितहानी नाही-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

Beed

लिंबागणेश भालचंद्र माध्यमिक विद्यालयासमोर डीव्हायडरवर गाडी चढुन अपघात,जिवितहानी नाही-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

बीड/वार्ताहर 

बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल भालचंद्र माध्यमिक विद्यालयासमोर मांजरसुंभा- पाटोदा ५४८ -डी राष्ट्रीय महामार्गावर पहाटे  ५ वाजता सुभाष महादेव केदार रा. सांगवी ता.केज जि.बीड यांच्या मालकीची चिप्स आदि मालवाहतुक करणारी अहमदाबाद (गुजरात)ते हैदराबाद वाहतुक करणारी गाडी क्रमांक एन एल-०१ एबी-७०९३ ,वाहनचालकाला अंधारात न दिसल्यामुळे गाडी डीव्हायडरवर चढुन अपघात होऊन त्यात महामार्गावरील दुभाजकाचे लोखंडी जाळया तुटलेल्या आहेत सुदैवाने जिवितहानी नाही. 
     
गेल्या महिनाभरापुर्वीच या मार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि वाहुन गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी केल्यानंतर गतिरोधक बसविण्यात आले आहेत.

Sharing

Visitor Counter