जिल्हा रूग्णालयाचे बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी) आज पासुन आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात
Beed

जिल्हा रूग्णालयाचे बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी) आज पासुन आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन बीड जिल्हा रुग्णालयात असलेले बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी)हे आज पासून आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली
बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर संसर्गबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. अवघ्या तिन दिवसात रुग्णांची संख्या २३ झाली तर एकाचा मूर्त्यू अजून १३ अहवाल येणे प्रलंबित आहेत. जिल्हा रूग्णालय हे फक्त आता कोरोना संसर्गबाधित रुग्णालय राहणार आहे.