मोठी बातमी 1 जून पासून देशात 200 पॅसेंजर ट्रेन धावणार, ऑनलाइन टिकिट बुकिंग ला आजपासून सुरुवात

मोठी बातमी 1 जून पासून देशात 200 पॅसेंजर ट्रेन धावणार, ऑनलाइन टिकिट बुकिंग ला आजपासून सुरुवात
रेल्वे र मंत्रालयाचा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि ग्रह मंत्रालय सोबत चर्चेनंतर झाला निर्णय..
नई दिल्ली 21 ! कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लोक डाऊनमध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 1 जून पासून 200 ट्रेन सुरु होणार आहे. यासाठी आज म्हणजेच 21 मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तिकिटाच्या बुकिंग ला सुरुवात होणार आहे. हे तिकीट ऑनलाइन नच बुकिंग करता येणार आहे. *आयआरसिटीसीच्या वेबसाईटवर* लोकल तिकीट बुक करू शकतील. या रेल्वे सेवेत .जनशताब्दी ट्रेन ,संपर्क क्रांति, दुरांतो एक्सप्रेस, आणि इतर नियमित प्रवासी यांचा समावेश आहे या ट्रेनमध्ये अनारक्षित नसतील.
रेल्वेमंत्र्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि ग्रह मंत्रालय व चर्चा केल्यानंतर रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून देशभरात 1 जूनपासून दोनशे रेल्वे सुरू करणार असल्याचं सांगितलं. तसंच वेळापत्रकानुसार ट्रेन सुरू होईल, असंही म्हटलं होतं.
ट्रेनमध्ये तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ तिकीट ची सुविधा नसेल. प्रवासी पहिली या ट्रेन सुरु होण्याच्या चार तास आधी आणि दुसरी यादी ट्रेन सुरू होण्याच्या दोन तास आधी तयार होईल. रेल्वे स्टेशन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांची स्कॅनिंग केली जाईल. कोरोनांची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्टेशन आणि ट्रेन मध्येप्रवेश करण्यास परवानगी असेल.
