जिल्ह्यात अशोकरावांचा प्रताप कायम!

Beed

जिल्ह्यात अशोकरावांचा प्रताप कायम!

नांदेड/वार्ताहर 

गत काही वर्षांपूर्वी एक बूस्टर डोस प्रताप गाजविण्यासाठी भाजपला मिळाला होता अशी चर्चा होती,परन्तु सद्यस्थितीत या बूस्टर डोसचा पॉवर संपुष्टात आल्याचे निदर्शनास येते.

आताच काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत सर्व जनतेने पाहिले की,काँग्रेस पक्षाने गड राखण्यात सरशी निर्माण केली होती,परन्तु भाजपात निवडणुकीदरम्यान मतभिन्नता,मनभिन्नता उमेदवार निवडीवरून नाराजी अशी सर्वप्रकारे चुरस निर्माण झाली होती,कदाचित याच अंतर्गत चुरशीमुळेच हा पराजय पत्करावा लागला,पण या निवडणुकीच्या पराभवानंतर चिंतन,मनन आवश्यक होते,तसे झाले नसल्याची माहिती मिळते उलट या निवडणुकीनंतर भाजपाची प्रदेश बैठकीस जिल्ह्यातील एकही नेते,कार्यकर्ते उपस्थित राहिले नसल्याबाबत वृत्त समोर आले.

नांदेड जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत,नगर परिषद निवडणुकीदरम्यान नायगाव येथे तर विद्यमान आमदार राजेश पवार यांना तर प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले,तर अर्धापुर येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हेच स्वतः पराभवाच्या दारात बसले. माहूर येथेही सौ.संध्या राठोड यांनी विजय मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली खरी परन्तु पक्षश्रेष्ठींची साथ न मिळाल्याने त्यांचाही काही प्रमाणात हिरमोड पहावयास मिळाला.

एकंदरीत जिल्ह्याची स्थिती पाहता विद्यमान पालकमंत्री यांचे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड वर्चस्व असल्याचे जाणवते,काही वर्षांपूर्वी हा बालेकिल्ला मोडून काढू म्हणून बलाढ्यतेने दंड थोपटणारे सर्व नेतेमंडळी यांनी दोन दिवसांपूर्वी हाती आलेल्या निकालाबाबत विचार करत कायम ध्यानात ठेवावयास हवे की,अशोकरावांचा प्रताप हा जिल्ह्यात कायम असेल...

विधानसभा, नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकीत तर प्रताप मंदावला आहे,तर जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत पूर्णपणे प्रताप थंडावलेला जनतेच्या निदर्शनास येईल

Sharing

Visitor Counter