मुख्याध्यापक व आरोग्य कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यूशी झुंज!

मुख्याध्यापक व आरोग्य कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यूशी झुंज!
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील विठ्ठल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. मेघा आटोळे ही, इयत्ता ९ या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. ०८/०१/२०२२ रोजी शाळेमध्ये कोविड लसीकरण होते.
लस घेण्या पूर्वी रजिस्ट्रेशन साठी सरांनी विद्यार्थ्यांनीला वडिलांचा मोबाईल नंबर मागीतला व मुख्याध्यापकांनी तीच्या वडिलांना फोन केला होता. यावेळेस विद्यार्थ्यांच्या वडिलांनी सांगीतले
सर माझ्या मुलीला लस देऊ नका* कारण तिला अंगा वरती लाल, काळे डाग व रक्त कमी आल्यामुळे नगरच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला औषधोपचार चालू आहेत.
अशी माहिती दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी सांगीतले नाही देणार लस असे वडिलांना सांगितले
मात्र तरी सुद्धा मुलीला लस देण्यात आली. व लस घेतल्याने विद्यार्थिनी मेघा ला ताप आली व ती मेंदूपर्यंत पोहोचली. तसेच मुलीला SLE (systemic lupus erythematosus ) हा आजार अस्थाना मेघा ला लस दिल्यामुळे. लगेच दुखणं सुरू झालं क्षिक्षकांच्या व डॉक्टर या दोघांच्या चुकी मुळे मेघाला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे.
यावेळी मेघाचे वडील शिवाजी आटोळे हे बोलत आहेत. शिक्षक आणि डॉक्टर यांच्या चुकीमुळे माझी चालती बोलती मुलगी आज मृत्यू मुखी पडलेली आहे . तरी सत्य चूक मला माहीत व्हावी व मला योग्य तो न्याय मिळावा ही
माझ्या मुलीचे काही बरेवाईट झाले तर शिक्षक लोक व डॉक्टर जबाबदार असतील असेही ते म्हणाले.
