जिल्हा कारागृहात एड्स संवेदीकरण कार्यशाळा

जिल्हा कारागृहात एड्स संवेदीकरण कार्यशाळा
बीड/वार्ताहर
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड यांच्या वतीने बीड येथील जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एचआयव्ही/ एड्स संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना जिल्हा कारागृह अधिक्षक व्ही. डी. भोईटे म्हणाले, एचआयव्ही/ एड्स हा अत्यंत संवेदनशील विषय असून या आजाराबाबत आपण पाल्यांनी जागरुक पालक या नात्याने माहिती दिली पाहिजे. तसेच लग्नापूर्वी युवक युवतींनी एचआयव्ही चाचणीची गरज असल्याचे यावेळी विशद केले.
जिल्हा पर्यवेक्षक सुहास कुलकर्णी यांनीही कारागृहातील उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना एचआयव्ही/एड्स विषयी मुलभूत माहिती दिली व कर्मचा-यांच्या प्रश्नांचे निरसन केले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. बी. पटेल यांनी एआरटी औषधोपचाराचे महत्व व सातत्य या बाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकामध्ये कार्यशाळा आयोजनामागचा उद्देश आणि जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स सेवा सुविधा इत्यादी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे यांनी दिल या कार्यशाळेस वरिष्ठ तुरुंग अधिकारी एम. एस. पवार, शरद मालशिकर,उस्मानी अजमत अली आणि कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. एफ. आर. फारोकी, नवनाथ चव्हाण व कारागृहातील कर्मचारी यांनी कार्यशाळा संपन्न होण्यासाठी प्रयत्न केला.सुत्रसंचलन अमोल घोडके यांनी केले तर आभार एफ.आर. इनामदार यांनी मानले.
