पार्टीचा प्राण म्हणजे कार्यकर्ता-जयसिंगराव गायकवाड

पार्टीचा प्राण म्हणजे कार्यकर्ता-जयसिंगराव गायकवाड
बीडमध्ये आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीची आढावा बैठक
बीड/प्रतिनिधी
कार्यकर्ता हा पक्षाचा आणि संघटनेचा आत्मा असतो, नेते आणि इतर वरिष्ठ मंडळी जरी पक्षाचे आधारस्तंभ असले तरी कार्यकर्ता हा आत्मा असतो. चांगल्या कार्यकर्त्याशिवाय पक्ष वाढीला चालना मिळत नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा विभागीय संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड यांनी रविवार दि.27 फेब्रुवारी रोजी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शहर कार्यकारिणी सर्व सेलच्या आढावा बैठकीमध्ये केले. या बैठकीत संघटना बांधणी, आगामी निवडणुका, कार्यकर्त्यांच्या अडचणी आदी बाबींविषयी विचारविनिमय व मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा मराठवाडा विभागीय आढावा दि.21 फेब्रुवारीपासून संपुर्ण मराठवाड्यात सुरू आहे. बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत पक्ष संघटन बळकटीसाठी आगामी काळात राबवायच्या ध्येय धोरणांवर संवाद साधला. तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी सर्व पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, सेवादल जिल्हाध्यक्ष पाशाभाई शेख, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर,रमेश चव्हाण, महिला शहराध्यक्षा रेहाना पठाण, युवती जिल्हाध्यक्षा विद्याताई जाधव, राम वाघ, मुस्तफा मेंबर, आमेर अण्णा, जैतुल्ला खान, खुर्शीद आलम, विशाल घाडगे, लक्ष्मण विटकर, बिभीषण लांडगे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर, जयमल्हार बागल, राजु महुवाले, अक्षय जाधव, निसार खान, पप्पू खान, सादेक अंबांनी, तालुकाध्यक्ष बाळासाहेब चिरके, सत्तार भाई, एजाज सौदागर, मुजीब भाई, मामु गुत्तेदार, अशोक चौरे यांच्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
