"टाईमपास वाला लव्ह" चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात

Beed

"टाईमपास वाला लव्ह" चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात

(पुन्हा घुमला लाईट,कँमेरा,एक्शनचा आवाज)

बीड/प्रतिनीधी

येथे नुकतेच 'टाईमपास वाला लव्ह' या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात करण्यात आली आहे.

निर्मलकाशी फिल्म प्राँडक्शन,मुंबईच्या बँनर खाली निर्मीत होत आसलेल्या "टाईमपास वाला लव्ह" या मराठी व हिंदी चित्रपटाचे निर्माता विशाल काशिनाथ जोहरे हे असून गोरख भारसाखळे यांनी लेखक व दिग्दर्शकाची बाजू सांभाळली आहे.

कँमेरामन अमोल गायकवाड तर सहदिग्दर्शक इंजी.डी.एन.इंगळे, सुनिल कोरके हे आहेत.

या चित्रपटात प्रमुख भुमिकेत विशाल जोहरे व रितू साबू हे आहेत.

या चित्रपटाची कथानक एका ग्रामीण भागातील प्रेमी युगूलांची असुन, फक्त नावापुरतेच प्रेम करणे व वापर करून सोडून देने पण् ज्या वेळेस प्रेमाची खरी जाण, जोडीदार या दुनियातुन गेल्यावर होते.

'प्रेम करा पण् प्रेमाची कदर हि करा', हा सामाजीक संदेश या कथेतुन गोरख भारसाखळे यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.

हा चित्रपट नक्कीच तरूणाईंना आवडेल अशी अशा हि या वेळी व्यक्त केली.

या चित्रपटात सचिन आढे,मंगल साबू, ममता पराते,शिवाजी कंधारकर,सिमा दडस,गोरख भारसाखळे,रती देवगडे,कलीम शहा,अमर मजमुले,राहूल कोरके,अमोल कुलकर्णी,सविता मेहेत्रे,निता खांडे,इंजी.डी.एन.इंगळे,अनिल गवई,समाधान खेंते,ए.जी.सय्यद,रामदास मोरे,बाबाजी सावंत,अनिकेत प्रसाद,शिव सानप,पुर्षोत्तम आगलावे,अभि प्रसाद,भगवान वायफळकर,कैवल्य भुते व ईतर कलाकार काम करीत आहे.

'टाईमपास वाला लव्ह' चित्रपटाचे चित्रीकरण जालना,औरंगाबाद,सोलापुर,कोल्हापुर, बुलढाना,सातारा व गोवा परीसरात होत असुन आज घडीला चित्रपटाचे 95% चित्रीकरण बुलढाना जील्ह्यात पुर्ण झाले आहे.

लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आसल्याची माहीती लेखक/दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांनी दिली.

Sharing

Visitor Counter