शिवसंग्राममध्ये इन्कमिंग सुरू,आ.मेटेंच्या उपस्थीतीत मोमिनपुरा येथील अनेक मुस्लीम युवकांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश

शिवसंग्राममध्ये इन्कमिंग सुरू,आ.मेटेंच्या उपस्थीतीत मोमिनपुरा येथील अनेक मुस्लीम युवकांचा शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश
बीड/वार्तहर
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकरावजी मेटे साहेब यांची जिल्हाभरात लोकप्रियता वाढत असुन युवकांचा विकास, महिलांचे सक्षमीकरण, स्वछता, पायाभूत सुविधांमध्ये विकासात्मक काम करण्याचे प्रभावी धोरण त्यांनी बीड जिल्ह्यात राबवीले आहे.अनेक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून आ.विनायकमेटे आकर्षण बिंदू आहेत हे सिद्ध होत आहे. जिल्ह्यातील विविध स्तरातील, जातीधर्मातील युवकांना आ.विनायकराव मेटे यांच्याबद्दल त्यामुळे आपुलकी निर्माण झाली आहे.
आ. विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शिवसंग्रामचे अल्पसंख्यक नेते अमजद पठाण यांच्या पुढाकाराने मोमिनपुरा परिसरातील येथील युसुफ खान इस्माईल खान उर्फ जुम्मनलाल, शेख वकील अहमद, मुन्ना खान, शेख असिफ, शेख रिजवान,सय्यद फरहान, शेख रहीम, शेख मोईन, शेख सलीम, नासिर खान, शेख वजीर शेख अरमान शेख जमील, शेख असिफ, शेख समीर, शेख अर्षद, शेख शाहरुख, आयुब खान, नजीर पठाण, निसार पठाण, राजू पठाण,अरबाज पठाण, शेख अमन, शेख इरफान, शेख इम्रान, शेख मोहसीन, शेख मुख्तार,, शेख मोईन, शेख सोहेल,शेख फारुख व शेख वासिम यांनी शिवसंग्राम मध्ये जाहीर प्रवेश केला.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,जेष्ठ अल्पसंख्यांक नेते खालेक पेंटर जिल्हा उपाध्यक्ष अडवोकेट राहुल मस्के व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. विनायकराव मेटे यांनी सांगितले की,शिवसंग्राम गोरगरीब, दीन- दलित, वंचित, गरजवंताच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिवस- रात्र परिश्रम करेल. आगामी काळात नगरपालिका नगरपंचायत,पंचायत समिति व जिल्हा परिषद काबीज करणे हे लक्ष्य आपल्यासमोर आहे हे गृहीत धरून कामाला लागले पाहिजे, सत्ताधारी क्षीरसागरांना सत्तेपासून वंचित ठेवले पाहीजे.जास्तीत जास्त जनतेपर्यंत तुम्ही पोहोचा व शिवसंग्राम संघटनेचे विचार व उद्देश साध्य करा. तसेच शिवसंग्राम शहरातील घरोघरी प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचविण्याचे बळ तुम्हाला मिळो अशा शब्दात पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा यावेळी आ. मेटे यांनी दिल्या.
